Goa DGP Jaspal Singh Dainik Gomantak
गोवा

Goa: ट्रिपल सीट तेही विदाऊट हेल्मेट, बाईक रायडरला थेट पोलिस महासंचालकांनीच पकडले

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गोवा पोलिस कारवाई करत दंड वसूल केला जात आहे.

Pramod Yadav

नाताळ आणि नवीन वर्षाचे (X’mas & New Year) स्वागत करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. राज्यातील वाहतूक व्यवस्था, कायदा व प्रशासन व्यवस्थित रहावे यासाठी गोवा पोलिस (Goa Police) सतर्क झाले आहेत. विशेषत: राज्यातील वाढलेल्या अपघातांची संख्या लक्षात घेता, पोलिसांनी वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे धोरण अवलंबले आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन (Traffic Violation) करणाऱ्यांविरोधात गोवा पोलिस कारवाई करत दंड वसूल केला जात आहे.

बाईक रायडरला थेट पोलिस महासंचालकांनीच पकडले

वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई सक्त केली आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या कोणालाच सूट दिली जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. याचा परिचय आज पोलिस महासंचालकांनी घडवून दिला.

झाले असे की, पर्रा येथे एक दुचाकी चालक विना हेल्मेट आणि ट्रिपल सीट जात असताना पोलिस महासंचालक जसपाल सिंग (Goa DGP Jaspal Singh) यांच्या निर्देशनास आले पोलिस महासंचालकांनी या दुचाकी चालकाला पकडले. रवी चालक असे या वाहन चालकाचे नाव असून, म्हापसा पोलिसांनी त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.

दरम्यान, दक्षिण गोव्यात वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी संयुक्तविद्यामाने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली. दोन दिवस केलेल्या या कारवाईत एकूण 345 वाहन चालकांविरोधात कारवाई केली. या कारवाईतून दोन लाख 68 हजार 500 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. यापुढे देखील ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT