Goa Police Green Corridor  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: कौतुकास्पद! गोवा पोलिसांनी शस्त्रक्रियेसाठी वेळेत पोहचवले यकृत; गोमॅको ते दाबोळी ग्रीन कॉरिडॉर

पोलिसांच्या कृतीचे होतेय कौतूक

Akshay Nirmale

Goa Police: गोवा पोलिसांच्या एका कृतीचे सध्या खूप कौतूक होत आहे. गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयातून एक यकृत शस्त्रक्रियेसाठी वेळेत दुसऱ्या ठिकाणी पोहचवायचे होते. त्यासाठी गोवा पोलिसांनी बांबोळीतील या गोमॅको रूग्णालयापासून ते दाबोळी विमानतळापर्यंतचा मार्ग ग्रीन कॉरिडॉर केला होता.

पोलिसांनी ही जबाबदारी यशस्वीरित्या पार पडली आहे. ग्रीन कॉरिडॉरमुळे विविध अयवय घेऊन रूग्णालयाची रूग्णवाहिका कमीत कमी वेळेत दाबोळी विमानतळावर पोहचली.

याबाबत उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले की, गोमॅको रूग्णालयात एका १९ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. त्या तरूणाच्या डोक्याला मार लागला होता. दरम्यान, तरूणाच्या नातेवाईकांनी त्या तरूणाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हाच एका प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी काही अयवयांची गरज असल्याचे रूग्णालय प्रशासनाला कळले होते.

संबंधित मृत तरूणाचे किडनी, यकृत, हृदय आणि इतर अवयव देण्यात आले. तथापि, डॉक्टरांनी किडनी वगळता इतर अवयव तातडीने नियोजित ठिकाणी पोहचविण्याची तजवीज केली. त्यासाठी पोलिसांनाही संपर्क साधण्यात आला.

रूग्णालयातील डॉ. प्रीती वर्गीस यांनी पोलिसांशी समन्वय साधून यात महत्वाची भूमिका बजावली. तर पोलिसांच्या पथकाने रविवारी सकाळी ग्रीन कॉरिडॉर करत या रूग्णवाहिकेसाठी मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे हे यकृत वेळेत दाबोळी विमानतळावर पोहचले. तिथून ते नियोजित ठिकाणी नेण्यात आले.

उत्तर गोवा पोलिसांच्या ट्विटरवरून ही माहिती देण्यात आली आहे. एखाद्या शस्त्रक्रियेवेळी अयवय प्रत्यारोपणात वेळेचे खूप महत्व असते. त्यामुळेच एखादा अवयव योग्य ठिकाणी वेळेत पोहचणे आवश्यक असते.

रविवारी गोमॅको रूग्णालयातून हे अवयव नियोजित ठिकाणी वेळेत पोहचणे आवश्यक होते. त्यामुळेच पोलिसांनी तत्तरतेने केलेल्या ग्रीन कॉरिडॉरचे कौतूक होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT