Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Subhash Velingkar Case: 'पॉलिटिकल केस असेल तर ते तात्काळ कामाला लागतात, पण...'; वेलिंगकर प्रकरणी पालेकरांचा पोलिसांवर निशाणा!

St Xavier DNA Controversy: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत वेलिंगकरांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन राज्यात राळ उठली आहे. ख्रिस्ती समुदायाने वेलिंगकरांच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे.

Manish Jadhav

Goa News: सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबाबत वेलिंगकरांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरुन राज्यात राळ उठली आहे. ख्रिस्ती समुदायाने वेलिंगकरांच्या तात्काळ अटकेची मागणी केली आहे. यातच, गोव्यातील आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनीही वेलिंगकरांच्या मुद्यावरुन गोवा पोलिसांवर निशाणा साधला.

पालेकरांचा निशाणा

गोवा पोलिसांची (Goa Police) एक खासियत आहे, ती म्हणजे पॉलिटिकल केस असेल तर ते तात्काळ कामाला लागतात. मात्र तसे नसेल तर ते कारणे देऊन वेळकाढूपणा करतात. वेलिंगकरांच्या बाबतीतही गोवा पोलिस मुद्दाम वेळकाढूपणा करतायेत. या सगळ्यात सरकारचाही तितकाच हात आहे. वेलिंगकराच्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा सरकारचा हात असणार, असा निशाणा पालेकरांनी साधला.

वेलिंगकरांचा अटपूर्व जामीन फेटाळला!

आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी सुभाष वेलिंगकरांना पणजी पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला. न्यायालयाने वेलिंगकरांचा सशर्त अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. वेलिंगकरांनी शनिवारी अटकपूर्व जामिनासाठी पणजी अतिरिक्त सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश बॉस्को रॉबर्ट्स यांनी वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. एवढचं नाहीतर वेलिंगकरांना पोलिसांसमक्ष हजर राहण्याचे आदेश देखील न्यायालयाने (Court) दिले.

तियात्रिस्त समुदायाकडून वेलिंगकरांच्या अटकेची मागणी

गोव्यातील तियात्रिस्त समुदायाकडूनही आता वेलिंगकरांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. सुभाष वेलिंगकर यांनी सेंट झेवियर यांच्याबाबत केलेली टिप्पणी ही निंदनीय आहे, तरीही वेलिंगकरांना वेळेत अटक करण्यात सावंत सरकार अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ज्युनिअरने लास्ट ईअरच्या विद्यार्थीनींवर कॉलेजच्या बाथरुममध्ये केला लैंगिक अत्याचार; अत्याचारानंतर म्हणाला, 'गोळी हवी का'?

Ravi Naik: फोंड्यात 'रवीं'चे अस्तित्व ठायी ठायी जाणवते! आता पुढे?

अग्रलेख: 'जंगल नसेल तर वाघाचा जीव जाईल, जर वाघ नसेल तर जंगल नष्ट होईल', गोव्यातील व्याघ्र प्रकल्पाचा तिढा

Ravi Naik’s Asthi Visarjan: खांडेपार नदीत दिवंगत रवी नाईक यांच्या अस्थींचे विसर्जन

Goa Mining: खूषखबर! राज्य खाण तयारी निर्देशांकात गोवा अव्वल; उद्योगवाढीची केंद्राला अपेक्षा

SCROLL FOR NEXT