Goa Police Cup Football Tournament Dainik Gomantak
गोवा

Goa Police Cup Football Tournament: वास्को, धेंपो क्लब उपांत्य फेरीत दाखल

Goa Police Cup Football Tournament: माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सचे आव्हान संपुष्टात

किशोर पेटकर

Goa Police Cup Football Tournament: वास्को स्पोर्टस क्लबने पेनल्टी शूटआऊटवर माजी विजेत्या चर्चिल ब्रदर्सला नमवून 19 व्या गोवा पोलिस कप फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. अन्य एका लढतीत धेंपो क्लबने एफसी तुये संघाचा 6-0 असा धुव्वा उडवून स्पर्धेतील अखेरच्या चार संघांत स्थान मिळविले.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर वास्को क्लब व चर्चिल ब्रदर्स यांच्यातील सामना निर्धारित वेळेत 1-1 असा गोलबरोबरीत राहिला. पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक नबकुमार घोष याच्या शानदार कामगिरीमुळे वास्को क्लबने 3-1 अशी बाजी मारली.

निर्धारित वेळेत ट्रिजॉय डायस याने 68 व्या मिनिटास केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्स संघ एका गोलने आघाडीवर होता, मात्र 83 व्या मिनिटास अॅश्ली फर्नांडिस याने केलेल्या गोलमुळे वास्को क्लबने गोलबरोबरी साधली.

गिरी येथे मैदानावर धेंपो क्लबने एफसी तुये संघावर सहजपणे मात केली. आता उपांत्य फेरीत धेंपो क्लबसमोर वास्को स्पोर्टस क्लबचे आव्हान असेल.

हा सामना शुक्रवारी (ता. 17) खेळला जाईल. स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना गुरुवारी (ता. 16) जीनो एफसी व कुठ्ठाळी व्हिलेजर्स यांच्यात खेळला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT