Arrest Dainik gomantak
गोवा

Goa Crime: 50 CCTV फूटेज तपासून फक्त कपड्यांवरुन घेतला शोध, विनयभंग प्रकरणी 5 महिन्यानंतर आरोपीला अटक

Goa Crime News: संशयिताचे तोंड झाकले असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.

Pramod Yadav

Goa Crime News

पर्वरी: सायंकाळच्या वेळी वॉकसाठी बाहेर पडलेल्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपीला पाच महिन्यानंतर अटक करण्यात आलीय.

पर्वरी पोलिसांनी तब्बल 50 CCTV फूटेज तपासून संशयित आरोपीचा शोध घेतला. आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२४ मध्ये याप्रकरणी तक्रार नोंद करण्यात आलीय.

रीवन मिरांडा (२१, रा. सूकूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२४ मध्ये सायंकाळी वॉकसाठी बाहेर पडलेल्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांत तक्रार नोंद करण्यात आली होती. गुन्हा सार्वजनिक ठिकाणी घडला असला तरी संशयिताचे तोंड झाकले असल्याने त्याचा शोध घेण्यात अडचणी येत होत्या.

घटना घडलेल्या परिसरातील जवळपास ५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून पोलिसांनी संशयिताने घातलेल्या कपड्यांची माहिती नोंद केली.

कपड्यांच्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शोध सुरु केला असता संशयित रीवन मिरांडा याला अटक करण्यात यश आले. पर्वरी पोलिसांनी संशयिताला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

रात्रीच्या वेळेस सार्वजनिक रस्त्यावर घटना घडली असली तरी संशयिताचा चेहरा दिसत नसल्याने त्याचा शोध घेण्यात अडचण येत होती. अखेर पोलिसांनी ५० सीसीटीव्ही कॅमेरे आणि कपड्यांच्या विश्लेषण करुन संशयिताचा शोध घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT