Goa Police MP Attack  Dainik Gomantak
गोवा

जंगलात घुसून डाकू 'हिरासिंग'ला पकडले, तपासासाठी गोवा पोलीस मध्यप्रदेशात, वाटेत सशस्त्र जमावाचा हल्ला; काय घडले नेमके? Video

Madhya Pradesh Goa Police Attack: : मध्यप्रदेशातील अलीराजपूर येथे घरफोडी प्रकरणांतील संशयितांना अटक करण्यासाठी गेलेल्या गोवा पोलिसांवर सशस्त्र हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: मध्यप्रदेशातील अलीराजपूर येथे घरफोडी प्रकरणांतील संशयितांना अटक करण्यासाठी गेलेल्या गोवा पोलिसांवर सशस्त्र हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात एक पोलिस उपनिरीक्षक व एक कॉन्स्टेबल किरकोळ जखमी झाले.

म्हापसा व पर्वरी पोलिस स्थानकांत नोंद असलेल्या, ‘हाय-प्रोफाइल’ निवासी संकुलांतील वेगवेगळ्या घरफोडी प्रकरणांचा तपास सुरू असताना संशयितांचा माग काढण्यासाठी गोवा पोलिसांचे सहा जणांचे विशेष पथक मध्यप्रदेशात गेले होते.

तपासादरम्यान चोरी टोळीचा मुख्य संशयित व म्होरक्या पोलिसांच्या ताब्यात आला. मात्र, या आरोपीला पोलिसांच्या तावडीतून सोडवून नेण्याच्या उद्देशाने वाटेत दबा धरून बसलेल्या शस्त्रधारी जमावाने पोलिसांवर अचानक हल्ला चढविला.

कायद्यालाच थेट आव्हान देणाऱ्या या भ्याड हल्ल्याला गोवा पोलिसांच्या धाडसी पथकाने समर्थपणे प्रत्युत्तर दिले आणि हल्लेखोरांचा डाव उधळून लावला.

अखेर शुक्रवारी (ता. ३० जानेवारी) गोवा पोलिसांनी संशयित हिरासिंग बामनिया (वय ३८, रा. बेहाडिया, अलीराजपूर) याला विमानाने गोव्यात आणले. सध्या तो पर्वरी पोलिसांच्या कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, म्हापसा तसेच पर्वरी पोलिस स्थानकांच्या कार्यक्षेत्रातील घरफोडीच्या संशयितांना अटक करण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये आलेल्या गोवा पोलिसांवर हल्लेखोरांनी हल्ला करून जखमी केले. दगडफेक, दडुंका, कोयते व इतर धारदार शस्त्रांनी केलेल्या या हल्ल्यात एक उपनिरीक्षक आणि कॉन्स्टेबल किरकोळ जखमी झाले.

ही थरारक घटना गुरुवारी सायं. ५ ते ६च्या दरम्यान घडली. या घटनेची माहिती नंतर, गोवा पोलिसांनी उत्तर गोवा पोलिस अधीक्षक व नंतर पोलिस महासंचालकांना देण्यात आली.

हिरासिंग गोव्यात; पोलिसांवरील हल्ला नियोजित

गोवा पोलिसांनी संशयित हिरासिंग बामनिया याला शुक्रवारी ट्रान्झिट रिमांडवर गोव्यात आणले. या संशयिताचे इतर तिघे साथीदार फरार असून, अद्याप पोलिसांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करायचा आहे.

या हल्ल्यात गोवा पोलिसांच्या खासगी गाडीच्या काचा फुटल्या. तर एका पोलिस कर्मचाऱ्याच्या पायाला तर दुसऱ्याच्या हाताला किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने, कोणालाही रुग्णालयात दाखल करण्याची स्थिती उद्भवली नाही.

पोलिस उपनिरीक्षक सीताराम मळीक व बाबलो परब यांच्या नेतृत्वाखाली पर्वरी आणि म्हापसा पोलिसांचे संयुक्त पथक संशयितांना पकडण्यासाठी गेले होते.

या पथकावर हा हल्ला झाला. हा हल्ला इतका अचानक आणि सुनियोजित होता की, पोलिस पथकाला स्वसंरक्षणाची संधीच मिळाली नाही. या हल्ल्यात गोव्याचे पोलिस उपनिरीक्षक मळीक आणि कॉन्स्टेबल पाटील हे किरकोळ जखमी झाले.

हिरासिंगचा एक किलोमीटर पाठलाग

या चोरीप्रकरणात सहभागी टोळीचा म्होरक्या हिरासिंग बामनियाचा एक किलोमीटर जंगलात गोवा पोलिसांच्या उपनिरीक्षक बाबलो परब, पोलिस उपनिरीक्षक सीताराम मळीक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.

ही सराईत गँग असून, गोव्यासह देशातील इतर मोठ्या चोरीच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग आहे. पोलिस संशयिताच्या इतर साथीदारांचा शोध घेत आहेत. या पथकात पोलिस उपनिरीक्षक बाबलो परब, उपनिरीक्षक सीताराम मळीक, तसेच कॉन्स्टेबल भिकाजी परब, प्रवीण पाटील, पुंडलिक आरोसकर यांचा या पथकात समावेश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Crime: खळबळजनक! घोगळ मशीद आवारात उपाध्यक्षाचा खून; चौघांच्या मुसक्या आवळल्या, हत्येला कमिटीच्या वादाची झालर

भाजपमध्ये ‘नवीन’ जोश! 2027 विधानसभा जिंकण्याच्या मोहिमेची रोवली मुहूर्तमेढ, राष्ट्रीय अध्यक्षांकडून दिवसभर बैठकांचे सत्र

Horoscope: अद्भुत गजकेसरी योग! आजचा दिवस प्रगती आणि लाभाचा; 'या' राशींना मिळणार चांगली बातमी

Viral Video: 'गोव्याच्या किनाऱ्यावर...' परदेशी सुंदरींचा मराठी गाण्यावर भन्नाट डान्स, सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Goa Election 2027: 'मिशन गोवा'साठी भाजपचा मास्टर प्लॅन तयार! राष्ट्रीय अध्यक्षांच्या उपस्थितीत रणनीतीवर शिक्कामोर्तब; विजयाची हॅट्ट्रिकसाठी 'जनसंपर्क पॅटर्न'

SCROLL FOR NEXT