Goa News Dainik Gomantak
गोवा

Bangaladeshi in Goa : गोव्यात बेकायदेशीरपणे राहणारे आणखी 12 बांगलादेशी ताब्यात

गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्धची मोहीम आणखी तीव्र केली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bangaladeshi in Goa : गोव्यात गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांनी राज्यात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्धची मोहीम आणखी तीव्र केली आहे. गोवा पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मेरशी येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या अशा 12 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची कोठडी ओल्ड गोवा पोलिसांकडे देण्यात आली आहे. ताब्यात घेतलेल्या बांगलादेशींना त्यांच्या निवासस्थानी स्थानबद्ध ठेवण्यात आले आहे. बांगलादेशी वंशाची संशयित दोन कुटुंबे मेरशी येथे भाड्याच्या खोलीत राहत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर एटीएसने तपास केला. त्यानंतर एटीएसच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन त्यांना ताब्यात घेतले.

ओल्ड गोवा पोलिसांनी अटक केलेल्यांची माहिती पुढील प्रक्रियेसाठी फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिस (FRRO) ला दिली आहे. सूत्रांनी सांगितले की, राज्यात विशेषत: खेड्यापाड्यात अनेक बांगलादेशी नागरिक व्यवसाय चालवत आहेत. काही दिवसांपूर्वीच हणजूण परिसरातून रेस्टॉरंट चालवणाऱ्या एका बांगलादेशी मायलेकाला ताब्यात घेण्यात आलं होतं.

राज्यात दहशदवादविरोधी पथक आणि पोलिसांच्या वतीने बांगलादेशींची शोधमोहीम सुरू झाली आहे. गेल्या महिन्याभरात 50 पेक्षा अधिकजणांना प्रतिबंधात्मक अटक करून त्यांच्या हालचालींवर निर्बंध आणून पोलिस नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हल्लीच काही महिन्यांपूर्वी दोन वर्षांपूर्वी अटक झालेले व पोलिस नजरकैदेत असलेले दोन बांगलादेशी फरारी झाले आहेत. त्यामुळे या प्रकरणावरून बांगलादेशींना नजरकैदेत ठेवण्यात येत आहे की तो फार्स आहे?, असा संशय लोकांकडून व्यक्त होत आहे.

वाळपई, आगशी, डिचोली, कोलवा, जुने गोवे या भागातून एटीएसने व त्यानंतर जिल्हा पोलिसांनी मुस्लिम असलेल्या परिसरात केलेल्या तपासणीत काही बांगलादेशी गेली अनेक वर्षे बनावट आधार कार्ड, निवडणूक कार्ड तसेच इतर राज्यातील घरांच्या खोट्या पत्त्यासह गोव्यात वास्तव्य करून असल्याचे उघड झाले आहे. व्हिसा नसलेल्या किंवा व्हिसा मुदत संपलेल्या विदेशी नागरिकांची पाठवणी होईपर्यंत त्यांना स्थानबद्ध करून ठेवण्यासाठी म्हापसा येथे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रामध्ये काहीच सुविधा नसल्याने त्यांना पुढील कारवाई होईपर्यंत गोव्याबाहेर न जाण्याचे निर्देश पोलिसांनी दिली आहे. मात्र, आवश्‍यक असलेल्या मूलभूत गरजांचा अभाव आहे.

ताब्यात घेऊन निर्बंध लादून सुटका केलेल्या बांगलादेशींना त्यांच्या मुलाबांळासह ठेवण्याची सोय या केंद्रात नाही. तसेच या सर्वांचा खाण्यापाण्याचा प्रश्‍नही आहे. ते सविस्तरपणे व्हिसा घेऊन भारतात आलेले नाही तर त्यांनी घुसखोरी केली आहे. त्यामुळे त्यांची पाठवणी करण्यासाठी सर्वतोपरी माहिती जमा करण्यात येत आहे. बांगलादेशच्या राजदुतांशी संपर्क साधून या सर्वांची भारतातून पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT