Moa Airport Dainik Gomantak
गोवा

मोपा विमानतळाबद्दल 'भ्रामक' व्हिडिओ बनवणं पडलं महागात! 'यूट्युबर'ला दिल्लीतून अटक, गोवा पोलिसांची मोठी कारवाई

Goa Police Arrest To YouTuber: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल (मोपा) सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला गोवा पोलिसांनी दिल्लीतून अटक केली.

Manish Jadhav

दिल्ली: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल (मोपा) सोशल मीडियावर चुकीची माहिती आणि अफवा पसरवणाऱ्या एका व्यक्तीला गोवा पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. आरोपीने विमानतळाला ‘भूतबाधा झालेला’ (Haunted) असा दर्शवणारा व्हिडिओ तयार करुन तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल केला होता, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अखेर गोवा पोलिसांनी अशा अफवा पसरवणाऱ्याला बेड्या ठोकल्या.

दरम्यान, या प्रकरणी 15 सप्टेंबर 2025 रोजी पणजी येथील पोलीस कर्मचारी सूरज शिरोडकर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, मोपा विमानतळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 352(2) सह 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.

‘रियल टॉक क्लिप्स’ वरुन व्हिडिओ व्हायरल

तपासादरम्यान, आरोपीने ‘Real Talk Clips’ नावाच्या फेसबुक चॅनेलवर एक व्हिडिओ अपलोड केल्याचे समोर आले. या व्हिडिओला ‘Goa Ka Haunted Airport’ असे शीर्षक देऊन त्यात मोपा विमानतळाबद्दल चुकीची, द्वेषपूर्ण आणि अंधश्रद्धा पसरवणारी माहिती देण्यात आली होती. हा व्हिडिओ लोकांमध्ये भीती आणि सार्वजनिक धोका निर्माण करण्याच्या हेतूने बनवण्यात आला होता. हा प्रकार विमानतळाची प्रतिमा खराब करण्यासोबतच, तिथे प्रवास करणाऱ्या आणि काम करणाऱ्या लोकांच्या मनात भीती निर्माण करणारा होता. अशा प्रकारचे व्हिडिओ समाजात गैरसमज आणि अशांतता पसरवण्यास कारणीभूत ठरतात, त्यामुळे पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली.

तांत्रिक तपास आणि दिल्लीत कारवाई

आरोपी सोशल मीडियावर अज्ञात राहून काम करत असल्यामुळे त्याला शोधणे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान होते. परंतु, गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दिल्लीमध्ये राहत असल्याचे पोलिसांना कळले. आरोपीला तात्काळ पकडण्यासाठी गोव्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने एक विशेष पथक तयार केले. या पथकात पोलीस उपनिरीक्षक (PSI) विराज सावंत आणि पोलीस कर्मचारी रविचंद्र बंडीवडकर यांचा समावेश होता.

या पथकाने कोणताही विलंब न करता दिल्ली गाठली. दिल्लीत त्यांनी आरोपीचा शोध घेतला. अथक प्रयत्नांनंतर पोलिसांनी त्याला दिल्लीतील द्वारका येथून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुढील चौकशीसाठी गोव्याला आणण्यात आले आणि आज संध्याकाळी अटक करण्यात आली.

पोलीस पथकाचे मोठे यश

दरम्यान, ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक नारायण चिमुळकर, पेडणेचे एसडीपीओ एम. सलीम शेख, आणि उत्तर गोव्याचे एसपी राहुल गुप्ता (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या अधिकाऱ्यांच्या नियोजनामुळे आणि टीमच्या जलद कृतीमुळे ही कारवाई यशस्वी झाली. सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी आपली तांत्रिक क्षमता वापरल्याचे यातून दिसून येते.

हा गुन्हा केवळ विमानतळाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न नव्हता, तर समाजात भीती आणि गैरसमज निर्माण करण्याचा एक गंभीर प्रकार होता. या यशस्वी कारवाईमुळे ऑनलाइन गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचा पोलिसांचा निर्धार दिसून येतो. पुढील तपास अजून सुरू असून, या गुन्ह्यात आणखी कोणी सहभागी आहे का, याचा शोध घेतला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Smriti Mandhana Century: स्मृती मानधनाचं ऐतिहासिक 'शतक'! सलग दोन वर्षांत अशी कामगिरी करणारी ठरली जगातील पहिली महिला क्रिकेटपटू VIDEO

SBI Bank Robbery: कर्नाटकातील एसबीआय बँकेवर मोठा दरोडा! तीन दरोडेखोरांनी लुटले 21 कोटींचे दागिने आणि रोकड, आरोपी पंढरपूरच्या दिशेने पसार

Mahindra Bolero: महिंद्रा बोलेरो निओचा नवा अवतार लवकरच बाजारात; जाणून घ्या बदललेले डिझाइन, फीचर्स आणि संभाव्य किंमत

Seva Pakhwada: मंत्री रमेश तवडकर नाराज? राज्यस्तर 'सेवा पखवाडा' कार्यक्रमाला मारली दांडी

Viral Video: प्री-वेडिंगसाठी रोमँटिक पोझ देणाऱ्या कपलचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, "समुद्रकिनाऱ्यावर जॉन सीनासोबत द रॉक!"

SCROLL FOR NEXT