Quepem Goa Crime  Dainik Gomantak
गोवा

Quepem Crime: पारोडातील महिलेच्या हत्येचे गूढ उकलले,सहा दिवसांनी संशयिताला मध्य प्रदेशातून अटक; 14 दिवसांची पोलिस कोठडी

Goa Police: केपे पोलीस सोमवारपासून या घटनेचा तपास करत होते आणि मंगळवारी पोलिसांनी रामकृमार रावत नावाच्या मध्य प्रदेशातील एका संशयिताला अटक केली

Akshata Chhatre

Quepem Paroda Woman Murder Case

पारोडा: केपे येथील 57 वर्षीय महिलेच्या हत्येप्रकरणी अखेर संशयित आरोपीला अटक करण्यात गोवा पोलिसांना यश आले आहे. मध्य प्रदेशमधून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या असून रामकुमार रावत असे या संशयिताचे नाव आहे. हत्येचे कारण काय, पोलिस आरोपीपर्यंत कसे पोहोचले हे अद्याप समजू शकलेले नाही.

मोडेवाडो- पारोडा येथे उबालदिना ब्रागांझा (वय 57) या राहत होत्या. ब्रागांझा यांच्या घराचे नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने त्या तात्पुरत्या मडगावात मुलीच्या घरी राहत होत्या. घराचे काम पाहण्यासाठी त्या दररोज पारोड्यात यायच्या. 21नोव्हेंबरला देखील त्या पारोड्यात घरी आल्या होत्या. दुपारी 12. 45 च्या सुमारास त्यांचे मुलीशी मोबाईलवर शेवटचे बोलणे झाले.

दुपारी दोनच्या सुमारास टाईल्स लावण्यासाठी एक कामगार ब्रागांझा यांच्या घरी परतला असता त्यांनी दरवाजा उघडला नाही. हा प्रकार त्या कामगाराने शेजारी राहणाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. शेवटी स्थानिकांनी शिडीच्या मदतीने खिडकीतून घरात डोकावून पाहिले असता ब्रागांझा या जिन्यावर मृतावस्थेत पडल्या होत्या.

स्थानिकांनी तातडीने पोलिसांना घटनेची माहिती दिली. ब्रागांझा यांच्या मुलीने दिलेल्या जबाबानुसार, आदल्या दिवशी म्हणजेच बुधवारी संध्याकाळी ब्रागांझा या कामगारांना देण्यासाठी रोकड घेऊन घरी परतल्या होत्या. हत्येनंतर ब्रागांझा यांच्याकडील रोकड आणि दागिने गायब झाले आहेत. यावरून चोरीच्या उद्देशाने ब्रागांझा यांची हत्या झाल्याचा अंदाज वर्तवत पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. हत्येच्या वेळी एक कामगार घरात होता आणि हत्येनंतर तो पळून गेल्याचे तपासात उघड झाले होते.

पोलीस उपनिरीक्षक गौतम शेटकर, हवालदार कल्पित रायकर आणि हवालदार साहिल शेटकर यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. संशयित कामगार हा मध्य प्रदेशात असल्याचे उघड होताच पोलिसांनी तिथे जाऊन आरोपीला अटक केली असून जेएमएफसीने त्याला १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT