Arrest Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोव्यात आला कामाच्या शोधात, सोबत आणला गांजा; ओडिशातील 29 वर्षीय युवकाच्या आवळल्या मुसक्या

Goa Ganja Case Arrest: गोव्यात कामाच्या शोधात येताना सोबत गांजा घेऊन आलेल्या ओडिशा राज्यातील एका २९ वर्षीय युवकाच्या कोलवा पोलिसांनी सुरावली येथे बुधवारी रात्री मुसक्या आवळल्या.

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: गोव्यात कामाच्या शोधात येताना सोबत गांजा घेऊन आलेल्या ओडिशा राज्यातील एका २९ वर्षीय युवकाच्या कोलवा पोलिसांनी सुरावली येथे बुधवारी रात्री मुसक्या आवळल्या. जेम्स बिदुदास लिमा असे या संशयिताचे नाव असून, त्याच्याकडील ४३ हजार ८०० रुपये किमतीचा ४३८ ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. कोलवा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही करवाई केली.

अमली पदार्थविरोधी प्रतिबंधात्मक कायद्याखाली संशयितावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संशयित जेम्स हा पूर्वी गोव्यात कामाला होता, असेही पोलिस चौकशीत आढळून आले आहे. त्याच्याकडे सापडलेला गांजा त्याने नेमका कुठून आणला होता व तो कुणाला देण्यासाठी आणला होता, याचा सध्या कोलवा पोलिस शोध घेत आहेत.

कोलवाळ पोलिसांकडून गांजा जप्त

अमलीपदार्थांच्या तस्करीविरोधात कोलवाळ पोलिसांनी गुरुवारी कारवाई केली. याप्रकरणी छापेमारी करून पोलिसांनी तब्बल ५ लाख ५० हजार किमतीचा ५ किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला असून संशयित गोविंद रंगी (१९) याला अटक केली आहे.

गुरुवारी दुपारी कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाकडे जाणाऱ्या सर्व्हिस रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी गोविंद रंगी याला ताब्यात घेतले. तो मूळचा राजस्थनातील रहिवासी आहे. पोलिसांनी संशयिताकडून गांजासह मोबाइलही जप्त केला. पोलिस निरीक्षक संजित कांदोळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

South Africa Mass Shooting: दक्षिण आफ्रिकेत रक्ताचा सडा...! 3 चिमुरड्यांसह 11 जणांचा मृत्यू; जोहान्सबर्गमध्ये अज्ञातांकडून अंधाधुंद फायरिंग

Goa Shack Fire: उतोर्डा येथील प्रसिद्ध 'जॅमिंग गोट'ला भीषण आग! पर्यटकांच्या लाडक्या शॅकचे मोठे नुकसान

छत्रपतींच्या आदेशानुसार बाजीराव पेशव्यांनी सरदार रामचंद्र सुखटणकर यांच्या सूचनेवरून 'मंगेशी' गाव मंदिराला दान केले..

Goa Salt Pans: 1964 साली गोव्यात 200 हून अधिक मिठागरे होती आणि आज..?

Goa Live News: साष्टी तालुक्यात वाहतूक पोलिसांचा 'बडगा'

SCROLL FOR NEXT