Cyber Crime Dainik Gomantak
गोवा

Cyber Crime: सायबर गुन्हेगारांना गोवा पोलिसांचा दणका! 16 राज्यांत छापे, 24 जणांना अटक, 8.21 कोटींची फसवणूक उघड

Goa Cyber Fraud Cases: सायबर गुन्हेगारीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा अवलंब करत गोवा पोलिसांनी आंतरराज्यीय ‘सायबर व्हिजिल २.०’ या विशेष मोहिमेअंतर्गत १६ राज्यांमध्ये २४ सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सायबर गुन्हेगारीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरणाचा अवलंब करत गोवा पोलिसांनी आंतरराज्यीय ‘सायबर व्हिजिल २.०’ या विशेष मोहिमेअंतर्गत १६ राज्यांमध्ये २४ सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे, तर २० जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

नोव्‍हेंबर महिन्‍यातील या कारवाईमुळे ३७ सायबर गुन्हे उघडकीस आले असून, यामध्ये सुमारे ८ कोटी २१ लाख ६७ हजार ९९९ रुपये (८,२१,६७,९९९.७३) इतक्या रकमेची फसवणूक उघडकीस आली आहे. ४३ पोलिस पथकांच्या माध्यमातून ही मोहीम राबवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक अक्षत आयुष आणि सायबर विभाग पोलिस अधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्‍वाखाली कारवाई सत्र झाले.

या संपूर्ण मोहिमेला पोलिस महासंचालक आलोक कुमार, पोलिस महानिरीक्षक केशव राम चौरासिया आणि गुन्हे व परिक्षेत्र पोलिस उपमहानिरीक्षक वेद प्रकाश सूर्य यांचे मार्गदर्शन लाभले. दरम्‍यान, ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत पोलिसांनी ८० सायबर जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करून सुमारे ८,१०० नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश पोहोचवला.

फसवणूक झाल्‍यास...

कोणत्याही आर्थिक सायबर फसवणुकीची तक्रार तात्काळ राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १९३० वर किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर नोंदवावी, असे आवाहन गोवा पोलिसांनी केले आहे.

१.९४ कोटी रुपये मिळवून दिले

गोवा सायबर पोलिसांना २०२६ या वर्षात संशयितांच्या फसव्या बँक खात्यांमधून १५.९४ कोटी रुपये गोठवण्यात यश आले आहे.

तसेच, ‘एमआरएम’ पोर्टलच्या माध्यमातून सायबर फसवणुकीतील पीडितांना सुमारे १.९४ कोटी रुपये (१,९४,३३,६८२) परत मिळवून देण्यात आले आहेत. फसवणुकीसाठी वापरले जाणारे १,७१७ सिम कार्ड्स, ७२२ सोशल मीडिया हँडल्स आणि ८१४ बनावट वेबसाइट्स ब्लॉक करण्यात आल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK U19 Final: अंडर-19 आशिया कपच्या फायनलमध्ये भारत-पाकिस्तान आमनेसामने; हेड टू हेडमध्ये कोणाचं पारडं जड? जाणून घ्या आकडेवारी

Goa Politics: लक्ष्मीकांत पार्सेकरांसह भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची 'घरवापसी'; मुख्यमंत्री सावंतांचे मांद्रेत कमळ फुलवण्याचे आवाहन

Crime News: टिकटॉक व्हिडिओ बनवण्याच्या नादात वाघिणीला पिंजऱ्यातून बाहेर काढलं अन् 19 वर्षांच्या तरुणाचा थेट गेमच झाला; कंटेंट क्रिएटरची चूक ठरली जीवघेणी

IND vs NZ: टीम इंडियासाठी खुशखबर! रोहित, विराट अन् श्रेयस अय्यरला शून्यावर बाद करणारा न्यूझीलंडचा घातक गोलंदाज पाचव्या वनडेतून बाहेर

US Flights: 11000 उड्डाणे रद्द, 15 लाख प्रवाशांचे अतोनात हाल... अमेरिकेतील हवाई सेवा का ठप्प झाली? 15 तासांनी वाहतूक पूर्ववत

SCROLL FOR NEXT