Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police Alert: यंदाचा पर्यटन हंगाम सुरु होण्यापूर्वी गोवा पोलीस अलर्ट मोडवर; NSG सोबत करणार दहशतवाद विरोधी सराव मोहीम

Goa Tourism Security: गोव्यात IFFI सारख्या कार्यक्रमांची शृंखला सुरु होईल म्हणून सुरक्षिततेच्या दृष्टीने पावलं उचलत पुढील आठवड्यापासून गोवा पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल एकत्र येत दहशदवाद विरोधी सरावाला सुरुवात करणार आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: राज्यात पर्यटन हंगाम लवकरच सुरु होणार आहे. गोव्यात IFFI सारख्या कार्यक्रमांची शृंखला देखील सुरु होईल आणि म्हणूनच सुरक्षिततेच्या दृष्टीने पावलं उचलत पुढील आठवड्यापासून गोवा पोलीस आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दल एकत्र येत दहशदवाद विरोधी सरावाला सुरुवात करणार आहेत.

गोव्याचे डीजीपी आलोक कुमार यांनी सांगितले की, गोव्यात लवकरच आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांचे प्रदर्शन असे दोन महत्वाचे कार्यक्रम पार पडणार आहेत आणि म्हणूनच राज्याची सुरक्षा बळकट असणे गरजेचे आहे.

दरम्यान, राज्याची सुरक्षेवर लक्ष देण्यासाठी पोलिसांची क्षमता आणि तयारी तपासण्यासाठी या सरावाची आखणी करण्यात आली आहे. सध्या राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी किनारपट्टीवरील पोलिस बंदोबस्त वाढण्यात आल्याची माहिती डीजीपी आलोक कुमार यांनी दिली.

राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांसह सध्या इंडियन रिझर्व्ह बटालियनच्या काही अधिकाऱ्यांना देखील गोव्याच्या किनारपट्टीवर तैनात करण्यात आले आहे. याशिवाय, राज्यातील जिल्हा पोलीस, दहशतवाद विरोध पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथ आणि क्राईम ब्रांचला विविध जबाबदाऱ्यांसह तैनात केले आहे.

उत्तर गोव्यातील सुरक्षा वाढवण्यासाठी सध्या पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत आणि याचाच एक भाग म्हणून कळंगुट पोलिसांकडून स्थानिक परिसरातील पर्यटकांना निशाणा बनवणाऱ्या दलालांविरुद्ध मोहीम सुरु करण्यात आली आहे.

कळंगुटमध्ये गेल्या 10 दिवसांत पर्यटकांना त्रास देण्याऱ्या दलालांच्या विरोधात 29 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पर्यटकांना कोणत्याही प्रकारच्या गैरसोयीशिवाय सुट्यांचा आनंद घेता यावा आणि स्थानिकांची सुरक्षा व्हावी म्हणून पोलीस चोवीस तास मदतीसाठी तत्पर असल्याची माहिती गोवा पोलीसांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: पर्वरीत बर्निंग कारचा थरार; कार जळून खाक

Viral Video IFFI Goa: 'मिसेस'साठी सान्याची घाई तर, लापता लेडिजच्या नितांशिने चाहत्यांना केलं खूश; इफ्फीतले खास व्हिडिओ

Goa Opinion: बँका आवळतात गोव्यातील लघू उद्योगांचा गळा

Goa CM: 'एक है तो सेफ है' म्हणत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महायुतीला दिल्या भव्य विजयाच्या शुभेच्छा

IFFI 2024: दरवर्षी एका तरी महान गोमंतकीयांची आठवण ‘इफ्फी’त व्हायला हवी! दिग्दर्शक बोरकर यांचे रोखठोक मत जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT