Goa Drugs Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Bust : शिवोलीत 2.53 कोटींचा अंमली पदार्थ जप्त, गोवा पोलिसांनी मोडले ड्रग्ज रॅकेटचे कंबरडे; नायजेरियन तस्करावर कारवाई

Nigerian National Arrested Goa : गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थांविरोधात सुरु असलेल्या मोहिमेत मोठे यश मिळवले.

Manish Jadhav

शिवोली: गोवा पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अंमली पदार्थांविरोधात सुरु असलेल्या मोहिमेत मोठे यश मिळवले. शिवोली परिसरात एएनसी पथकाने धडक कारवाई करत एका नायजेरियन नागरिकाला बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या या नायजेरियन नागरिकाचे नाव चिगोजी इनोसेन्ट न्झेदिग्वे असे आहे. त्याच्याकडून तब्बल 2 कोटी 53 लाख रुपये इतक्या किमतीचे वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले.

मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त

नायजेरियन तस्कर चिगोजी हा शिवोली (Siolim) परिसरात अंमली पदार्थांची तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती एएनसी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी छापेमारी करुन त्याच्या अटकेसह मोठ्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तपासणीदरम्यान त्याच्याजवळ विविध प्रकारचे अमली पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळले. यामध्ये प्रामुख्याने कोकेन, एमडीएमए (MDMA), गांजा आणि इतर सिंथेटिक ड्रग्जचा समावेश आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत गोव्यातील आतापर्यंतच्या मोठ्या जप्तींपैकी एक आहे.

चौकशीनंतर गुन्हा दाखल

एएनसी पथकाने चिगोजी इनोसेन्ट न्झेदिग्वे याला तात्काळ ताब्यात घेतले आणि कसून चौकशी केली. चौकशीअंती त्याच्यावर अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत (NDPS Act) गुन्हा नोंदवण्यात आला. गोव्यात पर्यटनाच्या नावाखाली होणाऱ्या ड्रग्ज तस्करीच्या घटनांवर लगाम घालण्यासाठी गोवा पोलिसांनी (Goa Police) कठोर पाऊले उचलली आहेत. या कारवाईमुळे गोव्यातील ड्रग्ज तस्करांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला. सध्या पोलीस या नायजेरियन तस्कराचे स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शन शोधण्यासाठी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

राज्यात मांस विक्रेत्यांची नोंदणी अनिवार्य! मोकाट जनावरे आणि पाळीव प्राण्यांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्र्यांचा 'मास्टर प्लॅन'

Jemimah Rodrigues: टीम इंडियाची धाकड 'रॉकस्टार'! जेमिमाच्या 'आशाएं' गाण्यावर नेटकरी झाले फिदा; दिग्गजांच्या उपस्थिती गायलं काळजाला भिडणारं गाणं WATCH VIDEO

गोवा मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय! मडगाव रवींद्र भवनचा होणार कायापालट; व्हॅट कायद्यात सुधारणा अन् 'जीआयएम'ला विद्यापीठाचा दर्जा

कोलवाळमध्ये टॅक्सी चालकांची गर्दी! मोपा विमानतळावरील 'वसुली' विरोधात आंदोलन; 210 रुपये शुल्कामुळे संतापाची लाट

Dhirio in Colva: सुरावलीत पुन्हा धीरियोचा थरार, पोलिसांकडून FIR दाखल; Viral Video वरुन चर्चा..

SCROLL FOR NEXT