Sound Pollution Goa Dainik Gomantak
गोवा

Noise Pollution: ध्वनी प्रदूषणाविरुद्ध पोलीस Action Mode वर! 9 आस्थापनांविरुद्ध कारवाई; म्युझिक सिस्टीम जप्त

Sound Pollution Goa: नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईव्यतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा आस्थापनधारकांना देण्यात आला आहे.

Sameer Panditrao

Police action on loud music in Goa

पणजी: गेल्या चार महिन्यांत पोलिसांनी किनारपट्टी भागात मर्यादेपेक्षा मोठ्या आवाजाने तसेच दिलेल्या वेळेच्या बंधनाबाहेर जाऊन ध्वनी प्रदूषण करणाऱ्या ९ पब्स व रेस्टॉरंट आस्थापनांविरुद्ध ११ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईवेळी या आस्थापनांची म्युझिक सिस्टीम जप्त करण्यात आली आहे.

ध्वनीप्रदूषणप्रकरणी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठ देखरेख ठेवत आहे. त्यामुळे उत्तर गोवा पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. विशेष पोलिस पथके किनारपट्टी भागात तैनात करून ध्वनी प्रदूषण व वेळमर्यादेचे बंधन घालण्यात येत आहे.

सर्व पोलिस स्थानकांना रात्रीची गस्त तसेच रेस्टॉरंट्स व पब्सवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईव्यतिरिक्त गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा आस्थापनधारकांना देण्यात आला आहे, अशी माहिती उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल यांनी दिली.

उत्तर गोवा पोलिसांनी गेल्या ऑक्टोबर २०२४ पासून ते आजपर्यंत ९ आस्थापनांविरुद्ध ११ गुन्हे दाखल झाले आहेत. हॉटेल डब्ल्यू गोवा व क्लब नाईन बार या दोन आस्थापनांविरुद्ध दोनवेळा कारवाई झाली आहे.

कारवाई झालेल्या आस्थापनांमध्ये सांग्रा स्पॅनिश तापूस अँड म्युझिक (मोझलवाडा - मोरजी), नोव्हा गोवा रेस्टॉरंट (वागातोर), डाईज पूल क्लब अँड बार (हणजूण), हॉटेल डब्ल्यू गोवा (वागातोर), सालूद (वागातोर), हिल टॉप ( वागातोर), क्लब नाईन बार (वागातोर), थालसा (वाडी शिवोली) व थालाशा क्लिफ (वागातोर) याचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT