New Appointed Constables training  File Photo
गोवा

Goa Constable Job: 54 होमगार्ड्सची तात्पुरत्या तत्वावर कॉन्स्टेबल भरती; 11 सप्टेंबरपासून प्रशिक्षण सुरू

11 सप्टेंबरपासून वाळपईमधील पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये तीन महिन्यांचे अनिवार्य प्रशिक्षण

Kavya Powar

Goa Constable Job: गोवा पोलिसांनी काल (शुक्रवारी) 54 होमगार्ड स्वयंसेवकांंना 'तात्पुरती' नियुक्ती आदेश जारी करून पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून सामावून घेतले आहे. नवनियुक्त कॉन्स्टेबल तुकडीचे येत्या 11 सप्टेंबरपासून वाळपईमधील पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये तीन महिन्यांचे अनिवार्य प्रशिक्षण सुरू होईल.

पोलीस अधीक्षक (PHQ) नेल्सन अल्बुकर्क यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद केले आहे की, ही नियुक्ती तात्पुरती आहे आणि त्यांना कायमस्वरूपी नोकरीची शाश्वती नाही. तसेच नुकतेच समाविष्ट झालेल्या कॉन्स्टेबल्सची नियुक्ती एका महिन्याची नोटिस देऊन रद्द केले जाऊ शकते.

नवीन हवालदारांना दोन वर्षांच्या प्रोबेशन कालावधीवर नियुक्त केले जाईल आणि त्यानंतर मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त किमान दोन आठवड्यांचे इंडक्शन प्रशिक्षण दिले जाईल, असे सांगण्यात येत आहे.

ही नियुक्ती तात्पुरती आहे. जर पडताळणीत असे दिसून आले की सादर केलेली प्रमाणपत्रे खोटी आहेत, तर कोणतेही कारण न देता आणि खोटी प्रमाणपत्रे तयार केल्याबद्दल अशा फौजदारी कारवाईचा पूर्वग्रह न ठेवता सेवा ताबडतोब संपुष्टात आणली जाईल, असे डीजीपी जसपाल सिंग यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT