Mahakumbh Dainik Gomantak
गोवा

Maha kumbh: कुंभमेळ्यात हरवले अन् हार्ट अटॅकने गाठले; गोव्यातून विशेष ट्रेनने प्रयागराजला गेलेल्या भाविकाचा मृत्यू

Mahakumbh Prayagraj 2025: घाबरलेल्या रामा यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

Pramod Yadav

कुडचडे: गोव्यातून विशेष ट्रेनने महाकुंभमेळ्यासाठी गेलेल्या ६० वर्षीय भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कुडचडे येथील व्यक्ती गोव्यातून विशेष ट्रेनने प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी गेला होता. कुंभमेळ्यात कुटुंबीयांपासून चुकामूक झाल्यानंतर ही घटना घडल्याचे समोर आले आहे.

रामा पेडणे (६०, कुडचडे) असे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

गोवा सरकारने प्रयागराजसाठी विशेष ट्रेनचे आयोजन केले होते. या ट्रेनमधून अनेक भाविक कुंभमेळ्यासाठी गोव्यातून रवाना झाले. दरम्यान, यात रामा पेडणेकर यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, रामा यांची कुंभमेळ्यात त्यांच्या कुटुंबीयांपासून चुकामूक झाली. यामुळे घाबरलेल्या रामा यांना हृदयविकाराचा झटका आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

महाकुंभमध्ये जानेवारी महिन्याच्या अखेरीस चेंगराचेंगरीची घटना घडली होती. यात ३० जणांचा मृत्यू झाला होता तर अनेकजण जखमी झाले होते. तसेच, दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर कुंभ मेळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला होता. यात लहान मुले आणि महिलांचा देखील समावेश होता. दरम्यान, विविध माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, कुंभमेळ्यात आत्तापर्यंत ५० कोटी लोकांनी हजेरी लावत पवित्र स्नान केले आहे.

यावर्षीचा कुंभमेळा ढीसाळ नियोजनामुळे वादात सापडला आहे. दोनवेळा झालेली चेंगराचेंगरीची घटना आणि भाविकांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका होत आहे. नुकतेच, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी कुंभ मेळ्याला मृत्यू मेळा असे संबोधत, योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Narkasur in Goa: नरकासुराला 'सायलंट' ब्रेक! रात्री 12 नंतर संगीत वाजवण्यावर पोलिसांचे निर्बंध

Ravi Naik: रवींना 'मगो'चे नेतृत्व मिळाले असते तर...?

Smriti Mandhana Wedding: नॅशनल क्रश क्लीन बोल्ड! स्मृती मानधना लवकरच लग्नबंधनात, 'या' संगीत दिग्दर्शकासोबत जुळली रेशीमगाठ

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

SCROLL FOR NEXT