Goa Petrol-Diesel Prices  Dainik Gomantak
गोवा

Goa Petrol-Diesel Prices: आठवड्याच्या शेवटी गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

Goa Petrol-Diesel Prices 11 November 2023: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाले आहेत.

Kavya Powar

Goa Petrol-Diesel Prices 11 November 2023: गोव्यात सरासरी 97.33 रुपयांनी पेट्रोलची खरेदी-विक्री होत आहे. इंधनाच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित असतात आणि त्या नियमितपणे सुधारल्या जातात. अनेक घटक किंमती निर्धारित करतात, जसे की रुपया ते यूएस डॉलर दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत आणि इंधनाची मागणी. आज (11 नोव्हेंबर) गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल झाले आहेत.

इस्त्रायल-हमास युद्धाचा परिणाम आखातातील देशांवर थेटपणे होत असल्याने त्यामुळे आखातातील तेल उत्पादक देशांमध्ये तणाव आहे. त्याचा परिणाम खनिज तेल उत्पादनावर होऊ शकतो. त्यामुळे जागतिक पातळीवर तेलाच्या किंमतींवर दबाव आहे.

गोव्यातील आजचे पेट्रोलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 97.54

Panjim ₹ 97.54

South Goa ₹ 97.11

गोव्यातील आजचे डिझेलचे दर खालीलप्रमाणे:

North Goa ₹ 90.10

Panjim ₹ 90.10

South Goa ₹ 89.68

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर केले जातात

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट

आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

अशा प्रकारे तुम्हाला आजची नवीनतम किंमत कळू शकते-

पेट्रोल डिझेलचे दररोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारेही जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9224992249 वर पाठवून माहिती मिळवू शकतात

आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड टाइप करून 9223112222 वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. तर, HPCL ग्राहक HPPprice आणि त्यांचा शहर कोड 9222201122 वर पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

Goa Crime: दिवसाढवळ्या अपहरणाचा थरार! व्यवसायिकाला लुटण्याच्या मनसुब्यावर स्थानिकांनी फिरवले पाणी

Kala Academy: चूक मान्य करा, कामाला लागा!

Goa Accident: गोव्यात नऊ महिन्यात 209 अपघात, तरीही 10 टक्क्यांची घट; 'हे' आहे मुख्‍य कारणं

SCROLL FOR NEXT