CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pernem Zoning Plan: मुख्यमंत्र्यांचा दिलासा! जमीन रूपांतरप्रश्‍नी लोकांना विश्‍वासात घेऊनच निर्णय होणार!

Pernem Zoning Plan: मुख्यमंत्र्यांनीही केले अाश्‍वस्त : आरोलकरांनी घेतली सावंत यांची भेट

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant on Pernem Zoning Plan: गेल्या आठवडाभरापासून चर्चेत असलेला पेडणे तालुका जमीन रूपांतर आराखडा स्थगित ठेवण्याचा निर्णय नगरनियोजन खात्याने घेतला आहे. मात्र, हा आराखडा रद्दच करावा, यासाठी स्थानिक नागरिक आग्रही आहेत.

यावर बुधवारी मुख्यमंत्र्यांनी सरकारचे धोरण स्पष्ट करत पंचायती, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विश्‍वासात घेऊनच याबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दांत त्यांना आश्‍वस्त केले.

गेल्या २० वर्षांपासून नियोजन आराखडा नसलेल्या पेडणे तालुक्यात नगरनियोजन खात्याने जमीन रूपांतराच्या विकास आराखड्याचा मसुदा बनवून तो जाहीर केला होता. यावर खात्याने सूचना आणि हरकती मागवल्यानंतर लोकांमध्ये उलट-सुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या.

स्थानिक आमदार जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत हा आराखडा रद्द करण्याची मागणी केली. तर पेडण्यात बैठका घेत आंदोलन सुरू केले. त्यानंतर नगरनियोजन मंत्री विश्‍वजीत राणे यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पंचायतींना विश्‍वासात घेऊन चर्चा केली.

त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय नेत्यांशी चर्चा करून हा आराखडा स्थगित ठेवण्यात येईल, असे जाहीर केले.

तरीही पेडणे तालुक्यातील काही पंचायत क्षेत्रांतील नागरिकांनी बुधवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मंत्रालयात भेट घेऊन आपली भूमिका मांडली. दुसरीकडे काही लोक हा आराखडा रद्दच करावा, अशी मागणी करत बैठका घेत आहेत.

पेडणेवासीयांची मंत्रालयावर धडक

‘पेडणे बचाव अभियान’ या बॅनरखाली बुधवारी शेकडो पेडणेवासीयांनी मंत्रालयावर धडक दिली. यावेळी त्यांनी ‘याप्रश्‍नी मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटायला यावे’, असा आग्रह धरला. अखेर पेडणेवासीयांपैकी काहीजणांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटायला जावे, असे ठरले.

झोन बदलामुळे आमचे जीवन उद्ध्वस्त होणार असून आमचा त्याला कायमचा विरोध असेल. आमचे आमदार फिरायला गेल्यामुळे ते येऊ शकत नाहीत.

त्यामुळे आम्ही स्वत:च पुढाकार घेतला, असे शिष्टमंडळाने सांगितले. यावेळी उपस्थितांच्या सह्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले.

नागरिकांच्‍या हिताचा विचार करूनच नगरनियोजन खात्‍याकडून पावले उचलली जात आहेत. पेडणे तालुक्‍यातील ‘झोनिंग प्‍लान’ संदर्भात नागरिकांना पूर्णत: विश्‍‍वासात घेतले जाईल, यात कोणताही संदेश नाही. या संदर्भात केंद्र सरकारलाही विश्‍‍वासात घेतले आहे.
विश्‍‍वजीत राणे, नगरनियोजन मंत्री
पेडणे जमीन रूपांतर आराखडा हा मोठा घोटाळा असून तो रद्द करावा आणि याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. लोकहिताचे प्रकल्प लोकप्रतिनिधींसह नागरिकांना विश्‍वासात घेऊन मार्गी लावले पाहिजेत. मात्र, हे सरकार लोकविरोधी असल्याने त्यांची भूमिका केवळ स्वहिताची आहे.
गिरीश चोडणकर, नेते, कॉंग्रेस.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT