Pernem Police arrested 4 interstate theves, Goa. on Monday,19 July2021 Nivrutti Shirodkar
गोवा

Goa: पेडणे पोलिसांनी पर्यटकांना लुटलेल्या आंतरराज्य ४ चोरट्यांना अटक

पेडणे पोलिसांनी (Pernem Police) आंतराज्य चोरट्या टोळीतील (Interstate Theves gang ) दिपेंद्रसिंग, मिस ज्योती प्रल्हाद सोनी, अंजिलिका मुकेश जैस्वाल व बिकी बारीक याना अटक केली.(Goa)

निवृत्ती शिरोडकर

पेडणे पोलीस (Pernem Police) निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार १८ रोजी अजितकुमार चेन्नाई या २२ वर्षीय युवकाने पेडणे पोलिसाना तक्रार दिली कि दाभोळी विमानतळावर चार अज्ञात दोन अज्ञात संशयित (Unknown Suspects) दोन पुरुष व दोन व महिला यांच्या संपर्कात आल्या आणि कारमध्ये लिफ्ट दिली व आपल्याला फोंडा (Ponda) येथे एका हॉटेलात सोडल्यानंतर पेडणेला (Pernem) पोहचवत असताना त्यांच्या डोक्यावर ठोसा मारून घट्ट पकडले व त्यांचे कडून रोख दोन हजार रुपये व महत्वाचे दस्तावेज असलेली पिशवी हिसकावून घेतली. तक्रारीची गंभीर दखल घेवून पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांच्या नैतृत्वाखाली विविध पथके तयार केली गेली आणि सूत्रे फिरू लागली, गुन्हा नोंद झाल्यानंतर ताबडतोब संशयितांनी वापरलेली सखेद रंगाची स्विफ्ट कार शोधण्याची मोहीम सुरु केली. त्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करण्यात आली. व्यापक तांत्रिक पाळत ठेवून आणि मानवी बुद्धिमत्तेद्वारे कारची ओळख पटविण्यात आली. तपासणी दरम्यान पेडणे पोलिसांना हॉटेल बुकिंगसाठी वापरला जाणाऱ्या मोबाईल क्रमांकद्वारे या टोळीतील एक संशयीत (दिपेंद्रसिंग) ताब्यात घेण्यात आले.

चौकशी दरम्यान संशयित दिपेंद्रसिंग यांनी मिस ज्योति प्रल्हाद सोनी, अंजिलिका मुकेश जैस्वाल आणि श्री. बिकी बारिक या या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर तीन सह आरोपींची नावे उघड केली. आरोपींकडून चोरी केली गेलेली फिर्यादीची दस्तावेज आणि गुन्ह्यात वापरलेली गाडीही पोलिसांनी यशस्वीरित्या ताब्यात घेतली. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभू देसाई, पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जिवबा दळवी करत आहेत. पोलीस निरीक्षक जीवबा दळवी यांच्यासह उपनिरीक्षक हरीश वैगणकर, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, उपनिरीक्षक संजीत कांदोळकर, हेड कोस्टेबल गुरुदास मांद्रेकर, सागर खोर्जुवेकर, यशोदास उगवेकर, विनोद पेडणेकर, अर्जुन कळंगुटकर, राजन धारण, देवदास यांच्यासह; तपास पथक दीपा शेट्ये, तृप्ती सातोडकर आदींनी उपयुक्त कामगिरी केली.(Goa)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

Goa ITI: ‘आयटीआय’ करणाऱ्यांसाठी खूशखबर! 2 वर्षांच्‍या कोर्सनंतर मिळणार दहावी, बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र; मुख्‍यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT