Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijai Sardesai: विकासाच्या नावाखाली पेडणे ते मुरगावपर्यंतच्या जमिनींची विक्री; गोवा फॉरवर्डचा खळबळजनक आरोप

गोमन्तक डिजिटल टीम

Vijai Sardesai राज्यात उद्योगातून रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी झुआरी कंपनीला कमी किमतीने दिलेल्या सुमारे 50 लाख चौ. मी. जमिनीचे तुकडे करून परप्रांतीयांना विक्री केली जात आहे. या जमिनीची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे, असे मत गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.

पेडणे ते मुरगावपर्यंतच्या जमिनी विकासाच्या नावाखाली विक्री काढण्यात आल्या आहेत. उद्योगासाठी जमिनी देऊन रोजगार वाढवण्याऐवजी त्या रिअल इस्टेटला देऊन काहीजण राज्यातील बेरोजगारी वाढवत आहेत.

राज्यात प्रादेशिक आरखडा आणल्यापासून लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. प्रादेशिक आरखडा 2021 अस्तित्वात आहे की नाही, हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे, असे मत आमदार विजय सरदेसाई यांनी व्यक्त केले.

सांकवाळ व वेळसाव येथील विक्री करण्यात आलेल्या जमिनीत बंगळुरूच्या रिअल इस्टेट कंपनीचा सुमारे 2014 सदनिका असलेला प्रकल्प येत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या मूलभूत गरजांवर त्याचा परिणाम होणार आहे सांकवाळ येथील जमीन विक्रीविरोधात स्थानिक रस्त्यावर उतरल्यावर त्याला गोवा फॉरवर्डचा पाठिंबा असेल असे आमदार सरदेसाई म्हणाले.

ते पुढे म्हणाले, नागरिकांच्या हिताचा सरकारने निर्णय घ्यावा. जमिनीसंदर्भात घेण्यात येणारे निर्णय लोकांना विश्‍वासात घेऊनच अमलात आणले पाहिजेत. गोवा फॉरवर्डने नेहमीच सामान्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडली आहे. मुख्यमंत्र्यांनीही सकारात्मकता दाखवावी.

रोजगाराचा होता हेतू

गोव्याचे विधाते व पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी झुआरी येथील सुमारे ५० लाख चौ.मी. जमीन ही औद्योगिकीकरणासाठी कमी किमतीने दिली होती.

गोव्यातील लोकांना या उद्योगातून रोजगार मिळावा हा त्यामागील हेतू होता. मात्र, या जमिनीचे आता झुआरी कंपनीने तुकडे करून ती रिअल इस्टेटला विक्री करण्यास सुरुवात केली आहे, असे सरदेसाई म्हणाले.

ही जागा निर्बंधित क्षेत्र

पर्यावरण मंत्रालयातील एका तज्ज्ञ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पर्यावरण नियमानुसार झुआरी व बिट्स पिलानी असलेली जागा ही निर्बंधित क्षेत्रात मोडते.

भोपाळ येथील युनियन कार्बडच्या घटनेनंतर झुआरी येथील क्षेत्र निर्बंधित म्हणून समावेश होणे गरजेचे होते. तांत्रिकदृष्‍ट्या हे क्षेत्र असुरक्षित असताना त्याची विक्री कशी केली जाते, असा प्रश्‍न आमदार सरदेसाई यांनी उपस्थित केला.

सांकवाळ व वेळसाव येथील सुमारे ४ लाख चौ.मी. जमीन विक्रीस काढण्यात आल्याने तेथील लोकांमध्ये नाराजी आहे. ही जमीन तेथील स्थानिकांची असल्याने ती तेथील लोकांना विक्री करावी, अशी मागणी त्या लोकांची आहे. याविरुद्ध स्थानिकांनी आंदोलन छेडण्याचे ठरविले असून त्याला गोवा फॉरवर्डचा पाठिंबा राहील.

- विजय सरदेसाई, आमदार

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sadanand Shet Tanavade: संसदेच्या वाणिज्य स्थायी समिती सदस्यपदी सदानंद शेट तानावडे यांची निवड

Bashudev Bhandari Missing Case: बाशुदेव भंडारी बेपत्ता प्रकरणी संशयितांची पोलिसांकडून कसून चौकशी; केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेताच तपासाला वेग

Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

MP Viriato Fernandes: गोवा आणि गोमंतकीयांसाठी अभिमानाचा क्षण! देशाच्या संरक्षण समितीवर कॅ.विरियातो फर्नांडिसांची नियुक्ती

Goa Politics: 'मुख्यमंत्री महोदय 2 लाख नोकऱ्यांबाबत तपशीलवार माहिती द्या...'; कॉंग्रेसचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT