Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून बदलापूर येथील अत्याचार प्रकरण चांगलंच गाजत आहे.
Badlapur Encounter: अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी राजकीय दावे विरुद्ध जनतेचा पाठिंबा; ''देवानेच न्याय केला...''
Badlapur EncounterDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून बदलापूर येथील अत्याचार प्रकरण चांगलंच गाजत आहे. बदलापूर येथील एका नामांकित शाळेतील 2 निष्पाप मुलींसोबत अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचाऱ्याने जघन्य अपराध केला होता. मात्र, आता अक्षय शिंदे पोलिसांच्या चकमकीत मारला गेला आहे. पोलिसांच्या या कारवाईने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. बदलापूरातील नामांकित शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अक्षय शिंदेने दोन निष्पाप मुलींसोबत केलेल्या कृत्याने महाराष्ट्र ढवळून निघाला होता. स्थानिकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर रेल रोको करत आंदोलनही केले होते.

दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईला लोकांचा पाठिंबा मिळत आहे. पोलिसांनी जे काही केले ते योग्यच केले असे असे बदलापूर वासीयांचे म्हणणे आहे. रहिवाशांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला, तर सोशल मीडियावर पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे आणि नरेश म्हस्के यांच्यासह राजकीय नेत्यांनी आणि काही पक्षांनी पोलिसांच्या या कारवाईला संमती दर्शवून लोकांच्या भावनांना पुष्टी दिली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईला "देवानेच न्याय" केला असल्याचे अनेकजण म्हणत आहेत.

दुसरीकडे, राजकीय हेतूसाठी ही कारवाई करण्यात आल्याचे महाविकास आघाडीमधील विरोध पक्षांनी म्हटले. या घटनेचा काही जणांनी फायदा घेतल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. अशा पोलिस कारवाईमुळे तपास आणि कायदेशीर प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. तर विरोधक एका संवेदनशील मुद्द्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे काही सोशल मीडिया यूजर्सचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com