Pernem Excise Scam Dainik Gomantak
गोवा

Pernem Excise Scam: काँग्रेस आक्रमक; "त्या प्रकरणाला आयुक्तही जबाबदार, त्यामुळे अटक..

दोन कोटींच्‍या घोटाळ्‍याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem Excise Scam पेडणे अबकारी कार्यालयात झालेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या अफरातफर प्रकरणी काँग्रेस प्रवक्ते संजय बर्डे यांनी आज खात्याचे आयुक्त नारायण गाड यांच्याविरोधात पेडणे पोलिसांत तक्रार करून त्यांना अटक करण्याची मागणी केली.

सदर तक्रारीत बर्डे यांनी म्हटले आहे की, खोटे शिक्के व कागदपत्रे तयार करून त्‍याचा दुरूपयोग करणे हा मोठा गुन्हा ठरतो.

नारायण गाड यांनी अबकारी खात्याचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पेडणे अबकारी कार्यालयाचे ऑडीट का झाले नाही याची चौकशी करणे त्‍यांचे कर्तव्‍य होते. पण ते त्यांनी पार पाडले नाही.

दोन कोटींच्‍या घोटाळ्‍यात हरीश नाईक याचे नाव समोर आल्‍यानंतर गाड यांनी पेडणे येथे येऊन अफरातफर केलेल्या या कर्मचाऱ्याविरोधात पोलिस तक्रार करून त्‍याला निलंबित करणे आवश्यक होते. पण तसे न करता त्‍यांनी त्‍या कर्मचाऱ्याची बदली सत्तरी अबकारी कार्यालयात केली व अबकारी निरीक्षकांना मात्र निलंबित केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT