Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Police in Delhi : दिल्लीत गेलेल्या गोवा पोलिस प्रशिक्षणार्थ्यांच्या ताटात मासे

आहाराबाबतच्या निर्णयासाठी समिती स्थापन

दैनिक गोमन्तक डिजिटल

Goa Police in Delhi: दिल्लीतील पोलिस प्रशिक्षण केंद्रात दाखल झालेल्या गोव्यातील पोलिस प्रशिक्षणार्थ्यांचा आहाराचा प्रश्‍न सुटला आहे. त्यांचा मेनू ठरवण्यासाठी केंद्राने एक समिती स्थापन केली आहे. त्यामुळे या गोव्यातील प्रशिक्षणार्थ्यांना गोमंतकीय आहाराचा (मत्स्याहारी) मेनूमध्ये समावेश करण्यात आला आहे.

प्रशिक्षण काळात काहींना त्रास झाला. मात्र कालांतराने ते वातावरणाशी जुळवून घेतील, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.

या केंद्रात दाखल झालेल्या सर्व राज्यांतील प्रशिक्षणार्थ्यांना एकाच प्रकारचा आहार दिला जातो. त्यामुळे गोव्यातून गेलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना आहारातील बदलामुळे अपचन होऊन आरोग्यावरही परिणाम झाला.

त्यातील काहींना ताप आल्याने इस्पितळात दाखल करण्याची वेळ आली. त्यामुळे गोमंतकीय प्रशिक्षणार्थ्यांना शाकाहारासह मांसाहार देण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. प्रशिक्षणार्थी व केंद्राच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलिस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिष्णोई यांनी या प्रश्‍नावर तोडगा काढला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Secrets Leak: इराण युद्धाचे सीक्रेट्स लीक? ट्रम्प सरकारकडून 50 हून अधिक अधिकाऱ्यांची 'पॉलीग्राफ टेस्ट'; पँटागॉनच्या इतिहासातील सर्वात मोठा तपास

Goa Crime: नातेवाईक महिलेसोबत भांडण अन्... तरुणाने स्वतःच्या पोटात चाकू खुपसून संपवलं आयुष्य, पोलिस तपास सुरू

Goa Crime: 11 वर्षांच्या शिक्षेला ब्रेक! अल्पवयीन विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी घडामोड; 60 वर्षीय आरोपीला सशर्त जामीन

कुस्तीच्या आखाड्यात जिंकली, पण आयुष्याच्या पटावर हारली! सासरच्या त्रासाला कंटाळून 3 लेकरांसह महिला पैलवानानं उचललं टोकाचं पाऊल; 2 मुलांचा मृत्यू, 1 गंभीर

Goa Sports: गोव्याचे खेळाडू पदकासाठी सज्ज; जम्मू-काश्मीरमध्ये रंगणार राष्ट्रीय सेपॅक टाकरो स्पर्धा

SCROLL FOR NEXT