Amboli Accident News Dainik Gomantak
गोवा

Amboli Accident News : तीन गाड्यांना ठोकून पळणाऱ्यास आंबोलीत घेतले ताब्यात

संशयित हा मूळ गुजरात येथील असून तो सध्या गोव्यात राहत होता

Rajat Sawant

मद्यधुंद अवस्थेत एका कारचालकाने तीन वाहनांना धडक दिल्याची घटना आज सावंतवाडी येथे घडली. धडक दिल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील ( drunk and drive ) रेंज रोव्हर चालक आंबोलीच्या दिशेने पळून गेला. मात्र, आंबोलीत फॉरेस्ट चौकीलगत एका पोलला त्याच्या कारची धडक बसल्यानंतर आंबोली (Amboli) पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेला संशयित हा मूळ गुजरात येथील असून तो सध्या गोव्यात राहत होता. तसेच त्याच्या ताफ्यातील रेंज रोव्हर कार गोवा पासिंग असल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलेला संशयित करण विमलेश आहेर ( २६, मूळ गुजरातचा सध्या रा. गोवा ) गोवा पासिंग रेंज रोव्हर कार घेवून झाराप येथून सावंतवाडी मार्गे आंबोलीच्या दिशेने वेगाने जात होता. यावेळी तो सावंतवाडी येथे आला असता त्याने दोन दुचाकी व कारिवडे येथे एका कारला धडक दिली. 

दरम्यान धडक दिल्यानंतर संशयित आंबोलीच्या दिशेने पळून जात असताना महादेवगड तिठ्यावर असलेल्या चेकपोस्टलगत एका खांबाला त्याने जोरदार धडक दिली. याबाबतची माहिती स्थानिकांनी सावंतवाडी पोलिसांना दिली होती.

त्यानंतर संशयिताला पोलिसांनी आंबोलीत ताब्यात घेतले. यावेळी संशयित कारचालक मद्यधुंद असल्याचे आढळून आले. पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT