Safe paragliding experiences in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Paragliding: पायलट हवेत कसरती करतात, त्याच अंगलट येतात; केरीतील दुर्घटनेनंतर व्यावसायिकाचा दावा

Goa paragliding safety: पृथ्वी यांनी सांगितले की, गोव्यात पॅराग्लायडिंग करणारे पायलट हवेत कसरती (ॲक्रोबॅटिक्स) करतात. त्यात विंग ओव्हर होण्याचा प्रकार घडल्यास दोर तुटण्याची जास्त शक्यता असते.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील पॅराग्लायडिंग करणारे पायलट हवेतील कसरती (ॲक्रोबॅटिक्स) करण्यावर भर देतात, त्यामुळे दोर तुटण्याचे किंवा ग्लायडर फाटण्याचे प्रकार घडतात. देशात हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील बीर बिलिंग येथे पॅराग्लायडिंग मोठ्या प्रमाणात केले जाते, तेथे ॲक्रोबॅटिक्स करण्यावर पूर्णपणे बंदी आहे, त्याचप्रमाणे नेपाळमध्येही यावर प्रकारावर बंदी आहे. मात्र, गोव्यात हा प्रकार सर्रासपणे केला जातो आणि त्यात पर्यटकांच्या जिवाशी खेळ होतो, असे कर्नाटकात पॅराग्लायडिंग व्यवसाय करणारा युवक पृथ्वी एच.पी. यांनी ‘गोमन्तक''शी बोलताना सांगितले.

पोलिस खात्याच्या त्रासाला कंटाळून गोव्यातील पॅराग्लायडिंगचा व्यवसाय गुंडाळून कर्नाटकात परतलेल्या पृथ्वी यांनी सांगितले की, गोव्यात पॅराग्लायडिंग करणारे पायलट हवेत कसरती (ॲक्रोबॅटिक्स) करतात. त्यात विंग ओव्हर होण्याचा प्रकार घडल्यास दोर तुटण्याची जास्त शक्यता असते. कारण दोन व्यक्ती आणि इतर साहित्याचे वजन साधारण १८० किलोपर्यंत जाते आणि त्याचा भार दोरीवर पडतो.

त्यामुळे ॲक्रोबॅटिक्स देशात कुठेही केले जात नाही, फक्त गोव्यात केले जाते. देशात सर्वात जास्त हिमाचल प्रदेशमध्ये पॅराग्लायडिंग व्यवसाय चालतो. याठिकाणी पॅराग्लायडिंग व्यवसाय करणाऱ्यांना ॲक्रोबॅटिक्स करण्यास बंदी असते. त्यावर पर्यटन खात्याची पूर्ण नजर असते, ॲक्रोबॅटिक्स करताना एखादा पायलट सापडला तर तत्काळ त्या व्यावसायिकाचा किंवा कंपनीचा परवाना रद्द केला जातो, असाच प्रकार नेपाळ देशातही आहे.

खरेतर पॅराग्लायडिंग करताना पर्यटकाला घेऊन अलगदपणे जमिनीवर उतरवणे पायलटचे कर्तव्य असते. पण गोव्यात तसे घडत नाही, पायलट हवेत कसरती करतात आणि त्याच अगंलट येतात असे सांगत पृथ्वी म्हणाले, पर्यटन खात्याकडून पॅराग्लायडिंग व्यावसायिकाला एका वर्षाचा परवाना मिळतो, त्या परवान्यावत किती ग्लायडर आहेत, हे नमूद करावे लागते. जेवढे ग्लायडर असतात, त्यानुसार परवाना शुल्क आकारले जाते.

परवान्याची मुदत?

आता संबंधित व्यावसायिकाचा परवान्याची मुदत संपली होती का? त्याने किती ग्लायडरचा परवाना घेतला होता? या प्रश्नांची उत्तरे चौकशीअंती पुढे येतील. परंतु आपण मृत्यू पडलेल्या पायलटला गोव्यात असताना पाहिले आहे, तो अत्यंत निष्णात होता. परंतु तो वापरत असलेला ग्लायडर व त्याचे साहित्याची क्षमता तपासली गेली होती का? हा एक प्रश्न आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Army Jawan Assaulted: देशरक्षकच असुरक्षित? लष्कराच्या जवानाला टोल नाक्यावर खांबाला बांधून मारहाण, 6 जण अटकेत

Heavy Rain in Goa: राज्याला मुसळधार पावसाचा तडाखा; 100 इंचापेक्षा जास्त पावसाची नोंद

Pune-Sindhudurg Flight: पुण्यातील कोकणवासियांना बाप्पा पावला... गणेश चतुर्थीनिमित्त 'Fly91'च्या उड्डाण संख्येत वाढ, वाचा सविस्तर

Memu Special Train: कोकणातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, 'या' मार्गावर धावणार अनारक्षित मेमू स्पेशल ट्रेन

कारच्या धडकेत एका मुलीसह आठ जण जिवंत जाळले; गुजरातमधील घटना

SCROLL FOR NEXT