Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City ची कामे मे पर्यंत पूर्ण करण्याचे सरकारचे लक्ष; मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या 'या' सूचना

Panjim Smart City: स्मार्ट सिटी’च्या कामाला गती द्या :मुख्यमंत्र्यांकडून आढावा

Ganeshprasad Gogate

Panjim Smart City: स्मार्ट सिटीची कामे 31 मेपर्यंत पूर्ण करण्यात येतील, असे सरकारने यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे दिलेल्या मुदतीत कामे पूर्ण करण्यासाठी आणखी गती द्या, गरज भासत असेल तर मनुष्यबळ वाढवा, अशा स्पष्ट सूचना डॉ. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) अधिकाऱ्यांना दिल्या.

मुख्यमंत्री सावंत यांनी गुरुवारी पणजी स्मार्ट सिटीच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या.

या बैठकीस पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, आयपीएससीडीएलचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम खाते, नगर नियोजन खाते, मलनिस्सारण खाते, वाहतूक पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मोन्सेरात म्हणाले की, कामे पूर्ण करण्याचे आव्हान मुदतीपूर्वीच होईल, अशी आशा आहे. रायबंदर येथील अंतर्गत रस्त्यांची कामे झाली आहेत. मुख्य रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे वाहतूक वळविली आहेत.

वाहतूक सुरू ठेवून कामे करता येत नाहीत. कंत्राटदारांना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. शहरात स्मार्ट सिटीतर्फे उभारलेल्या बसस्टॉपविषयी मी यापूर्वीच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्यांचा दर्जा निकृष्ट आहे.

त्यामुळे बसविलेले बसस्थानकाचे सांगाडे हटविले जातील. त्याशिवाय खासगी बसधारकांना ‘माझी बस' योजनेत सहभागी होण्याची सूचना केली आहे.

सीईओ संजीत रॉड्रिग्स म्हणाले की, रायबंदर परिसरात काम करणे आव्हानात्मक आहे. भरती आल्यानंतर जमिनीखालील पाण्याची पातळी वाढते.

त्यामुळे त्याचा परिणाम खोदकामावर होतो. तरीही नव्या यंत्रणेद्वारे काम केले जाणार आहे. सांतिनेजमध्ये सुरू असलेले काम होलीविकपूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे.

शहरात वाहतूक कोंडी होत आहे, हे मान्य आहे. परंतु सांतिनेजमधील एक मार्ग खुला केल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटेल, असेही त्यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT