Goa News | Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

Goa News: मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे आरोग्यास जास्त प्राधान्य- श्रीपाद नाईक

Goa News: आपल्या दैनंदिन व्यवहारात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणूनच गोवा संस्था आरोग्याला प्राधान्य देत आली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: आपल्या दैनंदिन व्यवहारात आरोग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि मातृभूमी सेवा प्रतिष्ठान, गोवा ही संस्था आरोग्याला प्राधान्य देत आली आहे, असे केंद्रीय मंत्री तथा मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी काढले.

दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून श्रीपाद नाईक यांच्या यांच्या सापेंद्र-ओल्ड गोवा येथील निवासस्थानी वर्ष पद्धतीप्रमाणे श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोफत चष्म्यांच्या वितरणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

तसेच, यावेळी पीआयबी गोवा विभागाचे उपसंचालक गौतम कुमार, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सिद्धेश नाईक, खोर्लीचे माजी सरपंच शिवा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, लवकरच केएलई या वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य आस्थापनाच्या सहकार्याने उत्तर गोव्यात २० ठिकाणी आरोग्यविषयक भव्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती मातृभूमी सेवा प्रतिष्ठानचे सचिव सूरज नाईक यांनी दिली.

25 हूनही अधिक शिबिरे

गेल्या चार वर्षांत मातृभूमी सेवा प्रतिष्ठानतर्फे गोव्याच्या विविध भागांत 25 हूनही अधिक नेत्रचिकित्सा आणि शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून 18 हजारांहूनही अधिक चष्म्यांचे वितरण करण्यात आले आणि डोळ्यांच्या एक हजारांहूनही अधिक यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. प्रसाद नेत्रालय, उडुपी, ईस्सिलोर, बंगळुरू आणि जेकेबी यांच्या सहकार्यामुळे मातृभूमी सेवा प्रतिष्ठानला ही जनसेवा करणे शक्य झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT