ST Reservation:  Dainik Gomantak
गोवा

ST Reservation: पणजीत तणाव, एसटी आंदोलकांना मांडावी पुलावर अडवत पोलिसांनी...

Ganeshprasad Gogate

ST Reservation: गोव्‍यातील एसटी बांधवांच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकाधिक ज्वलंत बनत चालला आहे. आरक्षण प्रश्नी विरोधीपक्ष सत्ताधाऱ्यांवर सातत्याने टीकास्त्र सोडत असून आज सोमवारी पणजीत एसटी बांधवांनी निदर्शने केली.

एसटी मोर्चा विधानसभेकडे जाऊ लागल्यावर पोलिसांनी तो मोर्चा मांडवी पुलावरच अडवल्याने आंदोलक संतप्त बनले. या सगळ्यामुळे राजधानीत तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती.

पोलिसांनी मांडावी पुलाची एक बाजू काही काळासाठी बंद केल्याने दुपारच्या वेळेत वाहनकोंडी निर्माण झाली होती. मात्र मांडवीच्या कॅसिनोबाजूच्या पूलाची दुसरी लेन सूर ठेऊन पोलिसांनी वाहतूक एका मार्गाने वळवली होती.

सत्ताधारी अत्यंत संधीसाधू असून त्याचे उदाहरण आजच्या आंदोलनात पाहायला मिळाल्याची टीका काँग्रेसच्या अमित पाटकरांनी केली.

राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी पणजी येथे अनुसूचित जमातींच्या विशाल मोर्चात भाजपचा गोव्याती एकही नेता, कार्यकर्ता उपस्थित न राहिल्याने भाजप हा अत्यंत संधिसाधू असून त्याचे आरक्षणाबाबतीतले मगरीचे अश्रू आज उघड झाले आहेत अशी टीका पाटकरांनी केली.

या संवेदनशील विषयावर मुख्यमंत्र्यांनी पळवाट न काढता समाजाच्या मागणीचा गांभीर्याने विचार करावा असेही पाटकर यांनी स्पष्ट केले.

तसेच आरजीचे आमदार वीरेश बोरकर यांनी एसटी राजकीय आरक्षणाचा मुद्दा अधोरेखित करण्यासाठी आणि एसटी समाजाला पाठिंबा देण्यासाठी सोमवारी विधानसभेत पारंपरिक पोशाख (धोती आणि बंडी) परिधान करत प्रवेश केला.

सुरुवातीला या पोशाखामुळे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना सभागृहात प्रवेश नाकारला. मात्र नंतर परवानगी देण्यात आली.

तर मतदारसंघाची फेररचना केल्‍यावर आरक्षणाचा निर्णय घेणार ही सरकारची भूमिका असेल तर येत्‍या विधानसभा निवडणुकीत गोव्‍यातील एसटी बांधवांना आरक्षण मिळणे कठीण आहे, असे वक्तव्य आमदार विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT