Chairman Ramesh Tavadkar Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat: निविदा प्रक्रियेत प्रचंड गैरव्यवहार अन् अफरातफर! ग्रामस्थांचा आरोप

Goa Panchayat: पाच वर्षांच्या कार्यकाळात पंचायतीने केलेल्या सर्व कामाचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमन्तक

Canacona: श्रीस्थळ पंचायतीच्या ग्रामसभेत वादग्रस्त निविदा प्रक्रियेवर वादळी चर्चा होऊन पंचायतीने हल्लीच चौदा कामासाठी जारी केलेल्या निविदा प्रक्रियेची (Tender Process) दक्षता खात्यामार्फत चौकशी करावी, तसेच गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात पंचायतीने केलेल्या सर्व कामाचीही चौकशी करण्याची मागणी केली. निविदा प्रक्रियेत प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार व अफरातफर झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.

पंचायत स्तरावरील गैरव्यवहाराची माहिती देण्याची मागणी प्रताप तुबकी यांनी केली. त्या मागणीस समर्पक उत्तर मिळत नसल्याने या प्रक्रियेची दक्षता खात्यामार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी करण्यात आली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपास सुरुवात झाली.

पंचायत कक्षेतील परवाना नसलेल्या सर्व बांधकामांवर कारवाई करण्याची मागणी पंच रामू नाईक यानी केली. यावेळी झालेल्या चर्चेत अजय तुबकी, पांडुरंग गांवकर, साधना नाईक, उमेश तुबकी, जेस फर्नांडिस, अखिल तुबकी व इतरांनी भाग घेतला. चौदा विकास कामांच्या निविदांच्या प्रक्रियेची दक्षता खात्यामार्फत चौकशी करावी व त्याचबरोबर मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात पंचायतीने केलेल्या सर्व कामांचीही चौकशी करण्याची मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला.

श्रीस्थळ औद्योगिक वसाहतीतील बंद उद्योग, वन हक्क दावे, घर नंबर, पंचायत कक्षेत चालणारे व्यवहार तथा अन्य गैरव्यवहार, कचरा प्रकल्प, कोमुनिदाद जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.

सभापती तवडकरांनी काही विषयासंबंधी बैठक घेऊन प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यास सभापतींनी सहमती दर्शवली. हल्लीच भाटपाल येथे संशयास्पद स्थितीत युवकाचा मृतदेह मिळाला होता. त्याचा योग्य तपास करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर नवीन समितीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू होताच शिरीष पै यांनी आक्षेप घेतला. गेल्या पाच वर्षात ग्राम विकास समितीची एकही बैठक झाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

अभिनंदनाचा ठराव

ग्रामसभेत शिरिष पै यांनी अभिनंदनांचे ठराव मांडले, त्यास विनय तुबकी यांनी अनुमोदन दिले. पंचसदस्य तसेच सरपंच तथा उपसरपंच, सभापतीपदी निवड झाल्याबद्दल रमेश तवडकर, राज्य पातळीवर गौरव झालेले स्वयंपूर्ण मित्र मिलिंद वेळीप, गोवा राज्य जैवविविधता बोर्डाचा राज्य पुरस्कारप्राप्त झालेले कांता गायक, गुणवंत विद्यार्थी भूमी राजेंद्र गोसावी व पूर्वा प्रमोद नाईक यांचे अभिनंदन करणारे ठराव मंजूर करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT