Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

Goa Panchayat Election : पंयाचत निवडणुकीसाठी जाहीर ओबीसी आरक्षणाला हायकोर्टात आव्हान

गोवा निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षणाविरोधात गोवा खंडपीठामध्ये 4 वेगवेगळ्या याचिका दाखल

विलास महाडिक

पणजी : पंचायत निवडणुकीसाठी गोवा राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ओबीसी आरक्षणाला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात चार वेगवेगळ्या याचिकांद्वारे आव्हान दिले आहे. त्यावरील प्राथमिक सुनावणी आज न्यायालयात होऊन निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत उत्तर देण्याचा आदेश देत सुनावणी बुधवारी 20 जुलै रोजी ठेवली आहे.

ओबीसी आरक्षणाविरोधात हडफडे-नागवा, पर्रा आणि कांदोळी पंयाचतींमधून आव्हान देण्यात आल्याची माहिती महाधिवक्ते देवीदास पांगम यांनी दिली आहे. ट्रिपल टेस्टची या निर्णयामुळे पूर्तता होत नसल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने नव्याने जाहीर केलेल्या ओबीसी आरक्षणाला या याचिकांच्या माध्यमातून आव्हान देण्यात आलं आहे. यासोबतच केवळ एससी, एसटी आणि जनरल आरक्षण वगळता अन्य आरक्षणाला स्थगिती देण्याची मागणी याचिकांमधून करण्यात आली आहे.

महाधिवक्ता पांगम यांनी दिलेल्या माहितीनुसार कोर्टाने उद्या मंगळवारी संध्याकाळपर्यंत आपलं म्हणणं मांडण्यास निवडणूक आयोगाला सांगितलं आहे. तसंच याची पुढील सुनावणी बुधवारी 20 जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य सरकारही प्रतिज्ञापत्र सादर करणार असल्याची माहिती पांगम यांनी दिली आहे. राज्य सरकारची भूमिका आरक्षणाच्या बाजूने असून आता जर ओबीसींना आरक्षण दिलं नाही तर पुढील 5 वर्षांसाठी त्यांच्यावर अन्याय होईल असं राज्य सरकारचं म्हणणं आहे.

ओबीसी आयोगाने दिलेला अहवाल राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे सादर केला आहे. हा अहवाल सखोल अभ्यासाअंती बनवण्यात आला असून यात कोणत्या पंचायतीमध्ये ओबीसींची संख्या किती आहे, त्यांचं प्रतिनिधीत्व कशाप्रकारे मिळालं आहे. तसंच आरक्षण जाहीर करण्यापूर्वी अद्ययावत डेचाचीही पडताळणी करण्यात आल्याचं स्पष्टीकरण पांगम यांनी दिलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT