Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

पंचायत निवडणूक : न्यायालयाच्या निकालाचे युरी आलेमाव यांच्याकडून स्वागत

लोकशाहीने दिलेले अधिकार मिळविण्यासाठी लोकांना न्यायालयात धाव घ्यावी लागणे दुर्दैवी असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोव्यात पंचायतीच्या निवडणुका 45 दिवसात घ्या, असा मुंबई उच्च न्यायालयाने जो निकाल दिला आहे त्याचे काँग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी स्वागत केले आहे. लोकशाहीने दिलेले अधिकार मिळविण्यासाठी लोकांना न्यायालयात धाव घ्यावी लागणे दुर्दैवी असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशात या संबंधी 3 दिवसात अधिसूचना जारी करावी असे म्हटले आहे. निवडणूक वेळेवर घेणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र अधिकारिणीवर सरकारचे दडपण चालते हे उच्च न्यायालयाच्या निवड्याने स्पष्ट केले आहे. या आयोगाने निःपक्षपातीपणाने निर्णय घेऊन आपली संविधानिक जबाबदारी पार पाडायची असते याकडे आलेमाव यांनी लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सोन्याच्या किमतीत तेजीचं 'महावादळ', दीड लाखांचा टप्पा फत्ते! गुंतवणूकदारांची चांदी, तर सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री

Horoscope April 2026: एप्रिल महिना 'या' राशीसाठी ठरणार 'लकी'! अविवाहितांसाठी सनई-चौघड्यांचे शुभ संकेत; जाणून घ्या ग्रहांची बदलती स्थिती

IPL 2026: "वैभव सूर्यवंशीच्या वादळासमोर प्रतिस्पर्धी ढेर, राजस्थान फायनलमध्ये जाणारच", दिग्गजाची मोठी भविष्यवाणी

IPL 2026 Points Table: मुंबई-चेन्नई तळाला! पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानचा दबदबा, आरसीबी बॅकफूटवर; पंजाब किंग्सच्या गोटात आनंदाचं वातावरण

GCA Premier League: वेगवान शुभम तारीचे पर्वरीत 'तुफान', डावात सहा गडी टिपले; 'चौगुले'समोर 'एमसीसी'चे नमते

SCROLL FOR NEXT