Panchayat Election in Goa | State Election Commission notifies quota for OBCs Dainik Gomantak
गोवा

307 प्रभागांत ओबीसींना 21 टक्के आरक्षण जाहीर

निवडणूक आयोगाकडून दुरुस्ती अधिसूचना जारी

दैनिक गोमन्तक

पणजी (Panaji): पंचायत निवडणुकांमध्ये अखेर 307 प्रभागात ओबीसींना आरक्षण दिल्याची दुरुस्ती अधिसूचना बुधवारी निवडणूक आयोगाने जारी केली. सरकारने सादर केलेला इतर मागासवर्गीयांचा डाटा ग्राह्य म्हणून राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींना निवडणुकीत 21 टक्के आरक्षण जाहीर केले. आरक्षणासाठी 19 पोटजातींची अधिसूचना मंगळवारी पंचायत संचालनालयाने काढली होती. निवडणुकांची घोषणा 18 जुलैपर्यंत होईल अशी माहिती आयोगाच्या कार्यालयातून देण्यात आली. (State Election Commission notifies quota for OBCs News)

न्यायालयाच्या निकालानंतर निवडणूक आयोगाने 10 ऑगस्ट रोजी मतदान तर 12 ऑगस्ट रोजी मतमोजणी असा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यासाठी ओबीसी आयोग व राज्य सरकारने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या ओबीसी डाटा ग्राह्य मानून निवडणूक आयोगाने ओबीसींना 21 टक्के आरक्षण दिले आहे. 2017 च्या निवडणुकीमध्ये 339 प्रभाग ओबीसींसाठी आरक्षण आरक्षित केले होते. यावेळी 307 प्रभाग ओबीसींसाठी आरक्षित करण्यात आले आहेत. त्या संदर्भातली दुरुस्ती अधिसूचना निवडणूक आयोगाने काढली. (Panchayat Election in Goa News in Marathi)

यापूर्वी आयोगाने एससी (SC), एसटी (ST) आणि महिला आरक्षण प्रभागाची घोषणा केली आहे. राज्याच्या पंचायत संचालनालयाने समाज कल्याण आणि ओबीसी आयोगाच्या सहकाऱ्यांनी ओबीसींच्या शैक्षणिक आणि नोकरभरती आरक्षणाप्रमाणे निवडणूक आरक्षणाची अधिसूचना जाहीर करत ओबीसींमध्ये येणाऱ्या 19 पोटजातींचीही घोषणा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: इरणा नवा 'गेमचेंजर' आक्रमक! मोजतबा खामेनेईंनी दिली अमेरिकेला खुली धमकी; जगाची 'लाईफलाईन' रोखणार?

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

SCROLL FOR NEXT