Traffic News | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Panaji Traffic News: पणजीत चालणेदेखील बनले आहे मुश्‍कील!

वाहतूक कोंडी : बेशिस्त पार्किंग, खोदकामांमुळे त्रास

दैनिक गोमन्तक

Panaji Traffic News: सध्या राजधानीत गटारे, पदपथांसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरू असलेले खोदकाम, भर रस्त्यात खोदलेले रस्ते तसेच इफ्फी महोत्सवानिमित्त शहरात वाढलेली रहदारी यामुळे स्मार्ट सिटी ही केवळ नावापुरतीच उरली आहे. वाहतूक कोंडीमुळे येथे आता चालणेदेखील अश्यक्यप्राय होत आहे. रस्ता ओलांडून पलीकडे जायचे म्हटले तरी वाट मिळणे मुश्‍कील झाले आहे.

राजधानी पणजीतील बहुतांशी भागात कोणते ना कोणते काम सुरू आहे. राजधानीचा विकास व्हावा मात्र त्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. अनेक ठिकाणी काम सुरू असल्याने रस्ते बंद केले आहेत. अनेकांना त्याची कल्पना नसल्याने अधिकच वाहतूक कोंडी होते.

पोलिसांची नेमणूक करावी

वाहतूक पोलिस असतील तर शक्‍यतो वाहतूक कोंडी होत नाही. मात्र, पोलिस नसतील तर बेशिस्‍तपणे पार्किंग केले जाते. याचा त्रास मग इतर वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही सोसावा लागतो. वाहतूक कोंडी होणाऱ्या ठिकाणी नियमितपणे पोलिसांची नेमणूक करावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे.

"पणजीत सर्वत्र पालिकेद्वारे खोदकाम सुरू आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. या खोदकामांंमुळे एक किलोमीटर असलेल्या अंतरावरील ठिकाणी जाण्यासाठी चार किलोमीटरचा वेढा घालून जावे लागत आहे, त्यामुळे कोणतेही काम अर्धवट सोडून दुसऱ्या कामाला सुरवात करू नये."

- उदय शिरोडकर

"पणजीत अनेक ठिकाणी काही व्यापारी आपले साहित्य फुटपाथावर ठेवतात. त्याप्रमाणे शहरी भागात खोदकामामुळे रस्ता बंद केला आहे. मात्र, तो केव्हापर्यंत बंद असणार याची कल्पना नाही. महानगरपालिका, वाहतूक विभाग आणि रस्त्याचे काम करणाऱ्यांमध्ये योग्य प्रकारचे नियोजन होणे गरजेचे आहे."

- रोलंड मार्टिन्स

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT