Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: इमारत पाडण्यासाठी अखेर महापालिकेला सापडला मुहूर्त

Goa News: महापालिकेची एकूण 65 कोटी रुपये खर्चून इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे.

दैनिक गोमन्तक

Goa News: महापालिकेला अखेर या महिन्यात शेजारील इमारत पाडण्यासाठी मुहूर्त सापडला. जेसीबीच्या साह्याने इमारतीचे बांधकाम पाडण्याच्या कामास संबंधित कंत्राटदाराने सुरुवात केली.

गेल्या महिन्यात आज-उद्या असे करीत इमारत पाडण्यास विलंब होत होता. महापालिकेच्या बाजूने यू आकाराचे मार्केट आहे. त्या मार्केटची दक्षिणेकडील बाजू पाडून त्या ठिकाणी 11 कोटी रुपये खर्चून इमारत उभारली जाणार आहे.

ही इमारत उभारल्यानंतर सध्याच्या महापालिकेतील सर्व कामकाज नव्या इमारतीत हलविले जाणार आहे. महापालिकेची एकूण 65 कोटी रुपये खर्चून इमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. ही रक्कम पुढे वाढण्याचीही शक्यता असली तरी सध्या मंजूर असलेल्या 11 कोटी रुपयांतून पहिल्या टप्प्यातील इमारत उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

इमारत उभारण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मागील महिन्यात शेवटच्या आठवड्यात इमारत पाडण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार या इमारतीतील कार्यालये व इतर साहित्य इतरत्र हलविले होते. दोनवेळा इमारतीचे बांधकाम हटविण्याचा निर्णय झाला होता; पण अमलात आला नाही. आज मात्र संबंधित कंत्राटदाराला इमारत पाडण्यासाठी मुहूर्त मिळाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: रविवार ठरणार खास! वृषभ-कर्कसह 'या' राशींवर लक्ष्मीची कृपा, घरात सुख-समृद्धी अन् नोकरीत प्रमोशनचे संकेत

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT