Vishwajit Rane|Goa News Dainik Gomantak
गोवा

Vishwajit Rane on Illegal Construction : ‘मोरजीत बेकायदा बांधकाम कराल तर सावधान'; विश्वजीत राणेंनी खडसावलं

Latest Goa News: पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम केले जात आहे.

दैनिक गोमन्तक

Vishwajit Rane: मोरजी येथील सर्वे क्रमांक 122/1 ए मधील क्षेत्र हे पर्यावरण संवेदनशील (ईएसझेड) असल्याने या परिसरात कोणत्याही प्रकारच्या बांधकामाला परवाना दिला जाणार नाही व त्यासंदर्भातचे निर्देश वन खाते तसेच नगर व शहर नियोजन खात्याच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती वनमंत्री विश्‍वजित राणे यांनी ट्विट करून दिली आहे.

मोरजी येथे दिल्लीतील गिरीश सरीन यांच्याकडून पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात बेकायदेशीर बांधकाम केले जात आहे त्याविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्याचे निर्देश वन खाते व नगर व शहर नियोजन खात्याला देण्यात आले आहेत.

या बांधकामाची अनेकवेळा पाहणी केल्यानंतर तसेच बांधकाम बंद ठेवण्याचे आदेश खात्याकडून जारी करण्यात आले, तरी हे बांधकाम सुरूच ठेवण्यात आले आहे. हे बांधकाम कोणत्याही परवानगीशिवाय सुरू आहे. या बांधकामाच्या शेजारीच कासव संवर्धन क्षेत्र आहे त्यामुळे योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

मोरजी येथील सर्वे क्रमांक 122/1ए हा पर्यावरण संवेदनशील क्षेत्र आहे तसेच जवळपास कासव संवर्धन क्षेत्र आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना बंदी आहे. अशा प्रकारच्या बांधकामांना कायद्यात असलेला अधिकाधिक दंड ठोठावला जाईल, असा इशारा मंत्र्यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT