Rajesh Pednekar | IFFI 2022 dainikgomantak
गोवा

Rajesh Pednekar IFFI 2022: ‘वाघ्रो’नंतर आता आणखी एक मोहेंजोदडो' - राजेश पेडणेकर

Rajesh Pednekar IFFI 2022: ‘मुंबईतील गिरणी व्यवसाय आणि त्यासाठी लागणारा कामगारवर्ग ही एक संस्कृती होती

यशवंत पाटील

IFFI Goa 2022: ‘वाघ्रो’ या शॉर्ट फिल्मला मिळालेल्या प्रतिसादानंतर आता मी मुंबईच्या गिरणी कामगारांची व्यथा मांडणाऱ्या ‘मोहेंजोदडो’ या माहितीपटाच्या निर्मितीत व्यस्त आहे. या माहितीपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

हा माहितीपट 53व्या आंतरराष्ट्रीय चित्रपटातील ‘फिल्म बझार’मध्ये सादर करण्यात आला. तो लवकरच प्रदर्शित होणार आहे, अशी माहिती चित्रपट निर्माते राजेश पेडणेकर यांनी दिली.

‘मुंबईतील गिरणी व्यवसाय आणि त्यासाठी लागणारा कामगारवर्ग ही एक संस्कृती होती परंतु काळाच्या ओघात मोहनजुदारो ही संस्कृती जशी लोप पावली तशीच गिरणगावातील गिरणी कामगार आणि त्याच्याशी संबंधित अवलंबितांची संस्कृतीही लोप पावली.

त्यामुळेच या माहितीपटाला ‘आणखी एक मोहेंजोदडो’ असे नाव देण्यात आले आहे. मुंबईतील कापड गिरण्या सुरू होत्या, तेव्हा त्यात अनेकांना रोजगार मिळाले. कोकणासह अनेक खेड्यापाड्यांतील लोक मुंबईत गेले, तेथे स्थायिक झाले.

त्यांच्या न्याय्य मागण्या मागण्याच्या निमित्ताने खरे तर देशात दत्ता सामंतप्रणित कामगारांची मोठी चळवळ उभारली गेली. परंतु जेव्हा तेव्हाच्या संपामुळे जेव्हा गिरण्या बंद पडल्या तेव्हा त्यावरील अवलंबितांची वाताहत झाली ’, असे राजेश पेडणेकर म्हणाले.

‘गिरणगावातील कापड गिरण्या गेल्या आणि त्या ठिकाणी मोठमोठे मॉल आले. कामगार आणि गिरणीवर अवलंबून असणारे विस्थापित झाले. त्यांची व्यथा आणि वेदना या माहितीपटातून आम्ही मांडायचा प्रयत्न केला आहे.

या माहितीपट निर्मितीसाठी आम्ही तीन वर्षे संशोधन केले आहे. यासाठी काही व्हिडिओ क्लिप्स आणि खूपशा मुलाखतींचा त्यात अंतर्भाव आहे. शिवाजी साटम, अशोक खांडे, कुमार केतकर, अण्णा डांगे यांच्या मुलाखतींचा त्यात समावेश आहे.

त्यांना गिरणगावाची जी संस्कृती माहिती होती, ती त्यांनी त्यात मांडली आहे. या माहितीपटाचे दिग्दर्शन प्रख्यात चित्रपट समीक्षक अशोक राणे यांनी केले आहे, असे पेडणेकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT