Accident | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Panaji Accident: हिट अँड रन प्रकरणी एकाला अटक ; चिंबल येथील अपघात

Panaji Crime: पोलिसांकडून सांगोल्डा येथे कारवाई

दैनिक गोमन्तक

Panaji Crime: मद्यधुंद अवस्थेत एप्रिलिया स्कूटरला पाठीमागून धडक देत दोघा भावांना गंभीर जखमी करणाऱ्या संशयिताला ओल्ड गोवा पोलिसांनी सांगोल्डा-गिरी परिसरातून अटक केली आहे. सतीश हिरणवाले (42) असे त्याचे नाव आहे.

वास्को येथील अल्पवयीन मुलांनी केलेल्या अपघाताची घटना ताजी असताना ओल्ड गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तक्रारदार प्रेमनाथ पार्सेकर (39) आणि कौशल बांदोडकर (25) रायबंदरवरून चिंबलकडे एप्रिलिया स्कूटर जीए 07 एडी 5171 वरून जात होते.

त्याचवेळी चिंबल जंक्शनवर पणजीवरून ओल्ड गोव्याकडे निघालेल्या जीए 08- एम 3438 या स्वीप्टने त्यांना मागून धडक देऊन गंभीर जखमी केले. यावेळी संशयित न थांबता गाडीसह फरार झाला होता.

या अपघातातील पाठीमागे बसलेला कौशल बांदोडकरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अपघातानंतर ओल्ड गोवा पोलिसांनी तपास केला असता गाडीचा शोध लावत संशयित सतीश यल्लाप्पा हरिणवाले, सांगोल्डा याला पोलिसांनी अटक केली आहे.

त्याच्या विरोधात आईपीएस 304 ए , 279 आणि मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. पीएसआय मनीषा मार्दोळकर अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT