Palolem News Dainik Gomantak
गोवा

Palolem News: 'त्या' जागेचा ताबा पर्यटन खात्याकडे, मत्स्योद्योग खात्याचेही दुर्लक्ष; मच्छीमारांनी केलीय 'ही' मागणी

झाडेझुडपे वाढली ः बंद पडलेल्या बर्फ फॅक्टरीच्या जागेत मासळी मार्केट उभारा

Ganeshprasad Gogate

Palolem News पाळोळे येथील जुन्या बर्फ फॅक्टरीच्या जागेत सुसज्ज मासळी मार्केट उभारण्याची मागणी मच्छीमारांनी केली असून काणकोण पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष दयानंद पागी यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे.

ही जागा सध्या अडगळीत असून त्या ठिकाणी झुडपे वाढली आहेत. पाळोळेत पालिकेचे दोन प्रभाग असून दोन्ही प्रभागात बहुसंख्येने मच्छीमार समाजाचे वास्तव्य आहे. पावसाळ्यातील जून महिना सोडल्यास पाळोळे समुद्रात वर्षभर मासेमारी करण्यास पूरक वातावरण असते.

या किनाऱ्यांवर जुलै ते सप्टेंबरपर्यत व त्यानंतरही पारंपरिक पायहोडी पद्धतीने मासेमारी करण्यात येते. त्यानंतर यांत्रिक बोटीनेही मासे मारी केली जाते.

पाळोळेत पन्नास पेक्षा जास्त यांत्रिक मासेमारी बोटी आहेत. पर्यटन व्यवसायाबरोबरच या ठिकाणी प्रामुख्याने मासेमारी व्यवसाय चालतो, असे स्थानिकांचे मत आहे.

येथील मच्छीमार समुदायाची समस्या जाणून घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी या ठिकाणी बर्फ फॅक्टरी उभारली होती.

जवळपास सुमारे पंधरा वर्षे ही फॅक्टरी व्यवस्थित चालली. परंतु अलीकडच्या काळात मत्स्योद्योग खात्याने या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकल्प सध्या बंद आहे.

जवळपास दहा वर्षे येथील कामगारांना कामाविना पगार देण्याची पाळी मत्स्योद्योग खात्यावर आली. त्यानंतर या प्रकल्पाची जागा पर्यटन खात्याकडे हस्तांतरित करण्यात आली.

मात्र पर्यटन खात्याने या जागेवर कोणताच प्रकल्प न उभारता हल्लीच्या काळात या जागेच्या जवळपास एका पंचतारांकित हॉटेलला परवानगी दिली आहे. त्यात काही राजकारण्यांचाही समावेश आहे.

रस्त्यावर मासे विक्री

पाळोळेत मासळी मार्केट नसल्याने मच्छीमार महिलांना रस्त्याच्या कडेला बसून मासे विक्री करावी लागते. काणकोण पालिकेच्या चावडी येथील मासळी मार्केटची दुरवस्था झाली आहे.

पाळोळे येथे मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. या ठिकाणी किरकोळ मासेविक्री बरोबरच मिनी मासळी मार्केटची सोय करावी, अशी मागणी दयानंद पागी यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT