Illegal Hill Cutting: हळदोणा येथे सुरु असलेल्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (MRF) प्लांटच्या बांधकामासाठी बेकायदेशीरपणे टेकडी कापण्याच्या कारणास्तव रामतळे येथील स्थानिकांनी हळदोणा ग्रामपंचायत आणि नानू कन्स्ट्रक्शन यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
सर्व्हे क्रमांक 343/16 मधील बेकायदेशीरपणे टेकडी कापल्याबद्दल मुख्य नगर नियोजकाकडून कोणतीही लेखी परवानगी घेण्यात आलेली नसल्याची बाबही समोर आलीय.
दरम्यान 60 हून अधिक गावकऱ्यांनी बांधकामाला तीव्र विरोध दर्शवल्याने परिस्थिती चिघळली असून पीआय सीताकांत नायक यांच्यासह म्हापसा पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव शनिवारी 23 डिसेंबर रोजी घटनास्थळी धाव घेतली.
मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी (MRF) प्लांटच्या बांधकामासाठी जी टेकडी कापण्यात येत आहे त्या जागेच्या अगदी जवळ रामतळे या नावाने प्रसिद्ध असलेल्या "रामतालेश्वर" मंदिरासह परिसरातील धार्मिक स्थानांना सदर प्लांटमुळे धोका निर्माण झाल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
लगतच्या टेकडी कटाईमुळे MRF प्लांटमधून निघणाऱ्या पाण्यामुळे मंदिराच्या विहिरीचे पाणी दूषित होण्याची ग्रामस्थांनी भीती व्यक्त केलीय. तसेच कटाई केल्यानंतर टेकड्यांवरून वाहणारे पाणी लगतच्या भातशेती आणि नद्यांमध्ये मिसळल्याने शेतीवर याचा अनिष्ट परिणाम जाणवणार आहे.
तसेच गाळाच्या पाण्यामुळे नदीतील जलाचारांनादेखील धोका संभवण्याची भीती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायत आणि नानू कन्स्ट्रक्शन जाणीवपूर्वक धार्मिक असंवेदनशीलता आणि पर्यावरणाचा ऱ्हास करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे येथील रहिवाश्यांनी ग्रामपंचायत आणि नानू कन्स्ट्रक्शनच्या कृतींची सखोल चौकशी करण्याची मागणी केलीय
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.