Robbery at Temple  Dainik Gomantak
गोवा

वास्कोत महालक्ष्मी मंदीरातील देवीचे अलंकार चोरीला

५ लाखांहून अधिक रक्कमेचे अलंकार असल्याचे पूजनोत्सव समितीकडून जाहीर

Dainik Gomantak

Goa: वास्को येथील टी. बी. कुन्हा चौकाच्या बाजूस असलेल्या धर्मशाळा येथील मुरगाव हिंदू समाजाच्या (Mormugao Hindu Samaj) श्री महालक्ष्मी पूजनोत्सव देवीच्या (Devi Mahalaxmi) अंगावरील सोन्याचे अलंकार (Ornament stolen) चोरीला गेल्याची घटना घडली. अंदाजे तीन लाखांपेक्षा अधिक रकमेचे हे दागिने असावेत, अशी माहिती पूजनोत्सव समितीतर्फे देण्यात आली. वास्को पोलिस या चोरी प्रकरणी तपास करीत आहे.

वास्को येथील मुरगाव हिंदू समाजाच्या श्री महालक्ष्मी पूजनोत्सव समितीतर्फे उत्सवाप्रित्यर्थ पुजण्यात येत असलेल्या महालक्ष्मीची मूर्ती सोन्याच्या अलंकाराने सजवली जाते. या देवीस अलंकारिक स्वरुपात सजवून देव्हाऱ्यात विराजित करण्यात आले होते. आज शनिवार (दि.६) सकाळी 07.30 वाजण्यापूर्वी देवीच्या अंगावर सोन्याचे अलंकार नव्हते. पुरोहित श्रींची पूजा करण्यासाठी आले असता देवीच्या अंगावरील चपलाहार, मंगळसूत्र अंगावर नसल्याचे नजरेस पडले. त्यांनी समाजाच्या पदाधिकाऱ्यांना याप्रकरणी माहिती दिली. वास्कोचे पोलीस निरीक्षक नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रितेश तारी, हवालदार संतोष भाटकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tripti Dimri: 'ॲनिमल' फेम तृप्ती डिमरी मिस्ट्री बॉयसोबत गोव्यात! व्हायरल फोटोंमुळे नात्याची चर्चा, हा मुलगा कोण?

Video: भावाचा विनोद पडला महागात, आईस्क्रीम विक्रेत्यानं लाथाबुक्क्यांनी मारलं; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Diogo Jota Dies: क्रिडाविश्वात खळबळ; स्टार फुटबॉलपटूचा कार अपघातात मृत्यू, 10 दिवसांपूर्वीच झाले होते लग्न

‘आठ दिवसांत चौकशी सुरु करा, अन्यथा...’; आजी – माजी आमदरांच्या गांजा आरोपावरुन काँग्रेस खासदाराचा मुख्यमंत्र्यांना इशारा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

SCROLL FOR NEXT