Monsoon Assembly Session | Opposition Mla Meeting Dainik Gomantak
गोवा

Monsoon Assembly Session 2023: पावसाळी अधिवेशनासाठी विरोधी सेना सज्ज! सरकारला घेराव घालण्यासाठी आमदारांची रणनीती बैठक

विरोधी पक्ष आपली एकजूट अधिकच भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे

दैनिक गोमन्तक

Monsoon Assembly Session: येत्या 18 जुलैपासून विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. हे अधिवेशन राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर आधारित असणार आहे. त्यामुळे विरोधी पक्ष विविध मुद्द्यांवरून सरकारला घेराव घालण्यासाठी पूर्ण तयारी करत आहेत.

याच अनुषंगाने रणनीतीवर चर्चा करण्यासाठी आज विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या चेंबरमध्ये सात विरोधी आमदारांची बैठक पार पडली.

या बैठकीला युरी आलेमाव, विजय सरदेसाई, वेंझी व्हिएगस, कार्लोस फरेरा, विरेश बोरकर, अल्टोन डिकाॅस्टा आणि क्रुज सिल्वा असे एकूण सात विरोधी आमदार उपस्थित होते.

यामध्ये अधिवेशनात मांडण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली असून विरोधी पक्ष आपली एकजूट अधिकच भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, येत्या पावसाळी अधिवेशनात म्हादई, खाण व्यवसाय, कायदा व सुव्यवस्था, महागाई आणि रोजगार हे विषय सत्ताधाऱ्यांना घेरण्यासाठी महत्त्वाचे असतील, असे परखड मत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे अधिवेशनात भाजप सरकारला उघडे पाडणे आणि कामकाजाची रणनीती ठरवणे, हाच आजच्या बैठकीचा मुख्य अजेंडा होता.

या अधिवेशनासाठी विधानसभा सदस्यांकडून तारांकित आणि अतारांकित प्रश्न मागविले आहेत. गोवा विधानसभा सचिवालयाने जारी केलेल्या अधिसूचनेवर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, सरकारला विरोधकांची भीती वाटते. त्यामुळेच कामकाजाचे वेळापत्रक केवळ १८ दिवसांचे केले आहे.

गोवा विधानसभेच्या अधिवेशनाचा काळ नेहमीच कमी केला जातो, असे सांगत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी हे सरकार लोकशाहीला मानत नाही का? असा सवालही उपस्थित केला होता. या अधिवेशनात नेमकं काय - काय पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT