Goa Fire Incidents Dainik Gomantak
गोवा

Goa Fire Incidents: एकाच दिवशी सहा ठिकाणी आग, गवत पेटण्याचे प्रमाण वाढले; आगरवाड्यात अनर्थ टळला

Goa: ज्वलनशील गवत वेळेत न काढल्यामुळे राज्यभरात सुक्या गवताला आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: ज्वलनशील गवत वेळेत न काढल्यामुळे राज्यभरात सुक्या गवताला आग लागण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. दरवर्षी नोव्हेंबरमध्ये अशा आगी लागण्यास सुरवात होते, यंदा त्याचे प्रमाण वाढले आहे.

शनिवारी एकाच दिवशी सहा ठिकाणी अशा आगीच्या घटनांची नोंद झाली आहे. खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयालगतच्या गवताला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास आग लागली. खोर्ली म्हापसा येथील प्रभू इमारतीजवळील सुक्या गवतास सायंकाळी पाच वाजता आग लागली होती. बेतकी येथे दुपारी ४ वाजता सुक्या कचऱ्यास आग लागली होती.

दुपारी सव्वा वाजता सुर्ल घाडीवाडा येथील सरकारी शाळेजवळीस सुक्या गवताने पेट घेतला होता. शिरसई कोमुनिदाद सभागृहाजवळील गवताला आज दुपारी साडेबारा वाजता आग लागली होती. सकाळी १०.३० वाजता बांबोळी येथील अन्न व औषध प्रशासन इमारतीजवळील सुके गवत पेटले होते.

दरम्यान, आगरवाडा येथील लक्ष्मी ट्रेडर्स या मंदार पोके यांच्या हार्डवेअर दुकानाला शनिवारी सायंकाळी आग लागली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने किरकोळ नुकसान झाले. दुकान बंद करून मंदार पोके नुकतेच गेले होते मात्र, दुकानातून धूर येत असल्याचे शेजारील महादेव यांच्या लक्षात आले त्यांनी लागलीच मंदार पोके यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली.

पोके यांनी लगेच पेडणे अग्निशामक दलाशी संपर्क साधला. जवानांनी तातडीने आग विझवली. यासाठी डॉम्निक मार्टिन, विकास चव्हाण, प्रमोद गवंडी, शेखर मयेकर, अमित सावंत, राजेश परब, शुभम कामत यांनी विशेष कामगिरी बजावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT