MGP Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'मगोचे अस्तित्व कायम राहणार'-सुदिन ढवळीकर

Goa Politics News: सरकार स्थापित करताना आम्ही मैत्रीचा हात पुढे करून भाजपसोबत युती केली होती.

दैनिक गोमन्तक

Maharashtrawadi Gomantak Party: काँग्रेसचे आठ आमदार भाजपमध्ये पक्षांतर केल्यानंतर सरकारातील घटक असलेल्या मगो आणि अपक्ष आमदारांवर दबाव आला आहे. मगोचे सरकारात दोन आमदार आहेत, त्यापैकी एक सुदिन ढवळीकर हे मंत्री आहे. पक्षांतराचे राजकारण व्हायला नको अशी भूमिका मगोने अगोदर घेतली होती. त्यामुळे आता घडलेल्या घडामोडींमुळे पक्षाचे धोरण आणि पुढील रणनीती काय असणार यावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

काँग्रेसमधून आमदार आले असले, तरी मगो - भाजप युती ही तटस्थ असून लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही जागा जिंकण्यास मदत करणार आहोत. मगो पक्ष हा गोव्यातील सर्वात जुना असल्याने त्याचे अस्तित्व कायम टिकून राहणार आहे. सरकार स्थापित करताना आम्ही मैत्रीचा हात पुढे करून भाजपसोबत युती केली होती.

तसेच, भविष्यात कितीही आमदार सरकार पक्षात आले, तरी मगो - भाजप युती अशीच भक्कम राहणार आहे. मगोचे स्थान सरकारात मित्र पक्ष म्हणून असल्याने भाजपच्या आंतरिक कारभारात आम्ही दखल देत नाही, असे विधान मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना केले.

मगोच्या एका निष्ठावंत कार्यकर्त्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की सध्या राज्यात सुरू असलेले राजकारण हे चुकीचे आहे. राजकारणात येणाऱ्या युवा पिढीसमोर चुकीचा संदेश जाऊन त्यांचा वेगळा समज होणार आहे. राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्या काळात आपल्या गावाचा विकास, समाजकार्य करण्याच्या उद्देशाने कार्यकर्ते काम करत होते.

पैशाचा वापर नसूनही कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे पक्षासाठी धडपड करत होते, परंतु राष्ट्रीय पक्ष राज्यात आल्यापासून राजकारणातील तत्त्व हरवले आहे. गोमंतकीयांचे हित जपण्यासाठी प्रादेशिक पक्ष आवश्‍यक आहेत. प्रादेशिक पक्षांचे किमान पाच ते सहा आमदार विधानसभेत असल्यास गोमंतकीयांचे प्रश्‍न ते मांडतील.

'मगोचे चिन्ह आजही जनतेच्या हृदयात'

आजही जनतेच्या मनात मगो पक्षाबद्दल आपुलकी आहे. पक्षाचे चिन्ह आजही जनतेच्या ह्रदयात आहे. आता पक्षाची पुढे वाटचाल करण्यासाठी कार्यकर्त्यांची नवी फळी तयार करण्याची आवश्‍यकता आहे. तसेच जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना घेऊन पक्ष बांधणीचे काम सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे.

एकाच पक्षाचे आमदार झाल्यास लोकशाहीसाठी ते घातक ठरणार आहे. श्रीकृष्णाने असुरांचा नाश केला होता, तेव्हा यादव कुळाला आव्हान देणारे कुणीच शिल्लक राहिले नव्हते. अखेर यादव आपसांत भांडून संपले आणि द्वारका पाण्याखाली गेली. विरोधी पक्ष संपल्यास देशात हीच स्थिती येणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

SCROLL FOR NEXT