Goa OBC Federation Dainik Gomantak
गोवा

Goa OBC Federation: राज्यातील ओबीसी समाजाच्या समस्या राष्ट्रीय पातळीवर मांडल्या; मधु नाईक यांची माहिती

OBC Federation Of India Meeting: इतर राज्यातील ओबीसी समाजाच्या समस्या व अडचणी समजून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

पिसुर्ले: राज्यातील ओबीसी समाजात येणाऱ्या एकूण १९ समाजांवर होत असलेला अन्याय व त्यांच्या समस्या राष्ट्रीय पातळीवर अमृतसर पंजाब येथील गुरू नानक देव विद्यापीठ येथे झालेल्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या ९ व्या मेळाव्यात मांडल्या आहेत. त्यांची दखल निश्‍चितपणे राष्ट्रीय पातळीवरील ओबीसी नेते घेणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या गोवा शाखेचे अध्यक्ष मधू नाईक यांनी दिली आहे.

मधू नाईक म्हणाले की, आपल्यासह गोवा शाखेचे मुख्य सचिव सर्वेश बांदोडकर, दामोदर नाडार, डॉ. दीक्षा नाडार, डॉ. श्रध्दा नाईक, डॉ. प्राची नाईक यांनी बुधवार,७ रोजी झालेल्या या मेळाव्यात सहभागी झाले. त्यामुळे इतर राज्यातील ओबीसी समाजाच्या समस्या व अडचणी समजून घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याच प्रमाणे गोव्यातील ओबीसी समाजाला कशा प्रकारे संविधानाने प्रदान करून दिलेल्या योजनांपासून वंचित राहावे लागत आहे, या संदर्भात सविस्तर माहिती या महामेळाव्याच्या माध्यमातून प्राप्त झाली.

यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, मुख्य सचिव सचिन राजुरकर यांनी गोव्यातील शिष्टमंडळाचे स्वागत करून, ओबीसी समाजाला भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून निश्‍चित केले जाईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले. या महामेळाव्याला देश भरातून विविध ओबीसी समाजाचे प्रतिनिधि उपस्थित होते असे शेवटी मधू नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT