Goa News | Handicap Dainik Gomantak
गोवा

Goa News: दिव्यांगांसाठी खास रोजगारसंबंधी मूल्यांकन अन् पुनर्वसन मार्गदर्शन शिबिर

Goa News: उत्तर गोवा जिल्ह्यात स्थायिक दिव्यांगांसाठी मूल्यांकन आणि पुनर्वसन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa News: राज्य दिव्यांगजन आयोग, नॅशनल करिअर सर्व्हिस सेंटर फॉर डिफरंटली एबल्ड, मुंबई आणि डिसेबिलिटी राइट्स असोसिएशन ऑफ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना रोजगार संधी मिळावी या उद्देशाने दिव्यांगांसाठी मूल्यांकन आणि पुनर्वसन मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

उत्तर गोवा जिल्ह्यात स्थायिक दिव्यांगांसाठी गुरूवारी, 20 ऑक्टोबर रोजी संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन, पर्वरी येथे होणार आहे. दक्षिण गोवा जिल्ह्यात स्थायिक दिव्यांगांसाठी शुक्रवारी, 21 रोजी गुजराती समाज एज्युकेशनल ट्रस्ट फॉर द हॅंडिकॅप्ड, मडगाव येथे होणार आहे.

कोविडपूर्वीच्या काळातच दिव्यांगांना नोकरी मिळवताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागायचा. कोविडमुळे अडथळे आणखी वाढले आहेत. दिव्यांगांना सक्षम बनविण्याच्या उद्देशाने राज्य आयोगाने दोन दिवसीय शिबिर आयोजित केले आहे, अशी माहिती राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर यांनी दिली.

दिव्यांग व्यक्तींचे शारीरिक कार्यक्षमतेचे मूल्यांकन, त्यांची मानसिक शक्ती, पात्रता आणि त्यांच्या आवडीचे क्षेत्र या सर्व बाबी शिबिरात नोंद केले जाईल, असे पावसकर यांनी सांगितले.

लागणाऱ्या कागदपत्रांची झेरॉक्स प्रत

दिव्यांग प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र/ लिव्हिंग सर्टिफिकेट, आधार कार्ड/पॅन कार्ड, शैक्षणिक आणि तांत्रिक प्रशिक्षण प्रमाणपत्र, एससी/एसटी/ओबीसी प्रमाणपत्र (जर दिव्यांग एससी/एसटी/ओबीसी समुदायातील असतील), पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, बायोडेटा

उद्या म्युझिक व्हिडीओ लाँच

‘ड्रॅग’च्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त न प्रख्यात कलाकार ट्रेसी डी कलंगुट यांनी असोसिएशनसाठी तयार केलेल्या संगीत व्हिडिओचा प्रीमियर गुरूवारी, 20 रोजी संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन, पर्वरी येथे करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT