मांद्रे आरजीच्या युवा नेत्या सुनयना गावडे याबाबत चर्चा करताना  Dainik Gomantak
गोवा

Goa: केरी गावात ना पाणी, ना नळ आरजी कडून जोरदार टीका

लोकांना नळाने पाणीपुरवठा करायचाच नव्हता, तर या साऱ्यावर करदात्यांच्या पेशांची नासाडी का केली?

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदरसंघांतल्या एकदम टोकाला असलेल्या केरी या गावातील एक अनोखा प्रकार रेव्होलूशनरी गोवन्सच्या(Revolutionary Govans) मांद्रे (Mandre)गटाने अधोरेखित केला आहे. या सुंदर अश्या गावात गेली कित्येक वर्षे लोक फक्त विहीर आणी बोरिंगच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

आरजीच्या मांद्रे गटाने याठिकाणी डोंगरावर असलेल्या टाक्यांना भेट दिली. या टाक्या कित्येक वर्षे वापरात नाही आहेत. येथील पायप लाईन पण जागोजागी फुटली आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओच्या माध्यमातून हा विषय लोकांसमोर आणला.

"या दोन भल्या मोठ्या टाक्यांचे सरकारने 2006 साली उद्घाटन केले होते. त्यावेळी गावात पायप लाईन टाकण्याचे काम देखील केले होते. काही घरांना मीटर देखील बसवून दिला होता. पण त्यांना आजतागायत नळाचे पाणी (water)मिळाले नाही. जर या लोकांना नळाने पाणीपुरवठा करायचाच नव्हता, तर या साऱ्यावर करदात्यांच्या पेशांची नासाडी का केली? एप्रिल, मे महिन्यात या लोकांनी आपल्या खर्चाने खोदलेल्या विहिरी आटतात त्यावेळी त्यांनी काय करावे", असे प्रश्न मांद्रे आरजीच्या युवा नेत्या सुनयना गावडे यांनी केले आहेत.

या गावातील फक्त एका वाड्यावर नळाची जोडणी आहे व त्यांना सुध्दा शेजारील गावातील टाकीतून पाणी पुरवठा करण्यात येतो. गावात टाक्या असून देखील त्या विनवापर तश्याच पडून आहेत. तरी सरकारने (government)या वर लक्ष देवून लवकरात लवकर ही समस्या सोडवावी असे आवाहन सुनयना गावडे (Sunaina Gawde)यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT