Kala Academy Slab Collapsed Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral : 'त्या' दोन अहवालानंतर नव्याने उभारणी आवश्यक होती; परंतु केवळ...

काब्राल : अकादमीसंदर्भात दोषी सापडतील

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Kala Academy जेव्हा कला अकादमीची बांधणी झाली, तेव्हापासूनच तिची अनेकदा डागडुजी झाली आहे. अकादमीची डागडुजी तसेच पुनर्बांधणीबाबत 1984 पासूनच वाद सुरू आहे. त्यामुळे 1984 पासून आतापर्यंतच्या कामांची एक श्‍वेतपत्रिका मी स्वतः तयार करणार असून त्याचा सविस्तर अहवाल जनतेसमोर ठेवण्यात येईल.

तसेच याप्रकरणी जो कोणी दोषी असेल, त्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

‘गोमन्तक टीव्ही’वरील कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीवेळी ते बोलत होते. यापूर्वी फर्मागुढी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाने कला अकादमी इमारतीच्या विविध चाचण्या करून दोन अहवाल सादर केले.

त्यात इमारतीच्या लोखंडाला गंज चढल्याचे निदर्शनास आले होते. खरे तर त्यावेळीच अकादमीची नव्याने उभारणी करायला हवी होती. परंतु आतापर्यंत केवळ वारंवार डागडुजीच करण्यात आली.

प्रत्यक्षातर चार्ल्स कुरैय्या यांचा अकादमी इमारतीचा आराखडा तसाच ठेवून नव्याने अत्याधुनिक पद्धतीने इमारतीची बांधणी करायला हवी होती, असे काब्राल यांनी सांगितले. कला अकादमीच्या पडलेल्या स्लॅबचा भाग नव्याने कॉलम उभारून पूर्ववत करण्यात येणार असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

‘साबांखा’त अनेक बदल

मी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्री झाल्यापासून खात्यात अनेक बदल केले आहेत. खरे तर खात्यात कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. 350 ते 400पदे रिक्त आहेत. असे असून देखील खात्याचे काम जोमाने सुरू आहे, असे काब्राल यांनी सांगितले.

हेरिटेज ग्रुपने करावी पाहणी

जरी अकादमी ही कला व संस्कृती खात्याची वास्तू असली तरी देखील माझ्या खात्याअंतर्गत तिचे काम सुरू आहे. त्यामुळे जर हेरिटेज ग्रुप किंवा इतर कोणतीही संस्था अकादमीची पाहणी करून काही सुचवू इच्छित असेल, तर त्यांचे स्वागत आहे, असेही काब्राल म्हणाले.

त्यावेळी मंत्री नव्हतो

1. कला अकादमीच्या पुनर्बांधणीचे काम मी या खात्याचा मंत्री होण्यापूर्वी झाले आहे. परंतु मागील विधानसभेत या विषयावर चर्चा झाली, त्यावेळी मी फाईल्स तपासल्या होत्या.

2. कला अकादमीचे ईपीसी तत्त्वावर कंत्राट दिले होते. ज्यावेळी हे कंत्राट दिले, त्यावेळी मी साबांखा मंत्री नव्हतो. हे कंत्राट मंत्रिमंडळाच्या संमतीनेच देण्यात आले होते, असे काब्राल यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT