म्हापसा, ता. १८: हडफडे येथील 'बर्च बाय रोमिओ लेन' अग्नितांडव प्रकरणाकडे सध्या सगळ्यांच्या नजरा खिळलेल्या आहेत. या प्रकरणात संशयित म्हणून अटक केलेल्या भरतसिंग कोहली, राजीव मोडक, प्रियांश ठाकूर, राजवीर सिंघानिया आणि विवेक सिंग यांना आज गुरुवारी (दि.१८) म्हापसा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
लुथरा बंधूंची पोलिस चौकशी करत आहेत. हडफडे येथील क्लब कुणाच्या आशीर्वादाने सुरू होता? कोणत्या खात्याला हाताशी धरून बेकायदा आस्थापन सुरू होते, याचा खुलासा लुथरा करणार का, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. महालात राहायची सवय असणाऱ्या लुथरा बंधूंना सामान्य कोठडीत राहावे लागत आहे. बेकायदा आस्थापनांविरोधात प्रशासनाने आता फास आवळला असून, कारवाई सुरूच राहील, अशी माहिती सूत्रांनी दिली.
अजय गुप्ताची जामिनासाठी कोर्टात धाव
गोव्यातील हडफडे येथील 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबमध्ये घडलेल्या भीषण अग्नितांडवाचे पडसाद अद्याप उमटतच आहेत. २५ निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्या या प्रकरणातील मुख्य आरोपी लुथरा बंधू सध्या पोलीस कोठडीत असतानाच, या क्लबचा दुसरा सह-मालक अजय गुप्ता याने आता कायदेशीर पळवाट शोधण्यास सुरुवात केली आहे.
अजय गुप्ताच्या जामीन अर्जावर सरकारी पक्ष आपले सविस्तर म्हणणे मांडणार आहे. तपास अजूनही प्राथमिक अवस्थेत असून, आरोपी बाहेर राहिल्यास पुराव्यांशी छेडछाड होऊ शकते किंवा साक्षदारांवर दबाव आणला जाऊ शकतो, असा मुद्दा पोलिसांकडून मांडला जाण्याची दाट शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.