Goa News |Death Case  Dainik Gomantak
गोवा

Goa News: तिरुपतीहून ‘एनओसी’शिवाय मृतदेह गोव्यात कसा आला?

तिरुपती पोलिसांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र नसताना तसेच मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचे प्रमाणपत्र नसताना वास्को येथील प्रभावती काणकोणकर या 75 वर्षीय महिलेचा मृतदेह गोव्यात आणला.

दैनिक गोमन्तक

Goa News: तिरुपती पोलिसांकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र नसताना तसेच मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला, याचे प्रमाणपत्र नसताना वास्को येथील प्रभावती काणकोणकर या 75 वर्षीय महिलेचा मृतदेह गोव्यात आणला. तिरुपती पोलिसांची ‘एनओसी’ नसताना गोव्यात तिच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी कशी करावी, असा पेचप्रसंग उभा राहिला.

ईमेलवरून तिरुपती पोलिसांना माहिती पाठवून दिली. त्यानंतर या समस्येवर तोडगा काढण्यात आला. पण त्यामुळे अंत्यसंस्कार सुमारे आठ तास लांबले. शेवटी आज दुपारी ३ वाजता बोगदा वास्को येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले

मुख्यमंत्री देवदर्शन योजनेखाली सदर महिला तिरुपती वारीवर गेली असता गुरुवारी पद्मावती देवळात जाताना ती अकस्मात कोसळली. त्यानंतर तिला तिरुपती येथील श्री वेंकटेश्वर मेडिकल सेंटर या खासगी इस्पितळात दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले होते. या मृत्युचे प्रमाणपत्र देताना त्या इस्पितळाने मृत्यूचे कारण समजण्यासाठी शवचिकित्सा करण्याची गरज असल्याचेही स्पष्ट केले होते.

वास्तविक दुसऱ्या राज्यात अशा प्रकारे मृत्यू होतो, त्यावेळी त्या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना देणे आवश्यक असते. मात्र स्थानिक पोलिसांना याची कुठलीही माहिती न देता तसेच शवचिकित्सा न करताच हा मृतदेह गोव्यात आणण्यात आला. काल रात्री 11 वाजता हा मृतदेह गोव्यात पोहोचला.

गोव्यात मृतदेह पोहोचल्यावर घरच्यांनी अंत्यसंस्कार करण्याची तयारीही सुरू केली. आज सकाळी हा अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. मात्र मृत्यूचे कारण सांगणारा कोणताही दाखला नसल्यामुळे पेचप्रसंग उभा राहिला.

हा मृतदेह मडगाव येथील जिल्हा इस्पितळात आणण्यात आला. पण तिरुपती पोलिसांची ‘एनओसी’ नसताना शवचिकिसा कशी करावी? ही तांत्रिक अडचण उभी राहिल्याने पेचप्रसंग उभा झाला. डॉ. मधू घोडकिरेकर यांनी या मृत्यूची ईमेलवरून तिरुपती पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर इतर सोपस्कार पूर्ण केले. त्यानंतर या मृत्यूची तिरुपती पोलिस स्थानकात रीतसर नोंद करण्यासाठीं फातोर्डा पोलिस तिरुपतीला जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली.

ह्रदयविकाराने प्रभावतीचा मृत्यू झाल्याचे उघड

शवचिकित्सा केल्यानंतर सदर महिलेचा मृत्यू हृदयविकाराचा झटका आल्याने झाल्याचे उघड झाले. देवदर्शनाला जाताना तिची तब्येत बरी नव्हती, असे तिच्या कुटुंबीयांनी प्रशासनाला सांगितल्याची माहिती मिळाली आहे. मात्र सरकारी योजनेखाली वारीला गेले असता तिथे मरण आल्यावर आवश्यक ते सोपस्कार पूर्ण न करता हा मृतदेह गोव्यात कसा आणला?

याबद्दल समाज कल्याण खात्याच्या संचालक संध्या कामत यांना विचारले असता, ज्या एजन्सीद्वारे हे भाविक यात्रेवर गेले होते, त्या एजन्सीने हे सोपस्कार करण्याची गरज होती. त्यांनीच आम्हांला याबद्दल कळविणे आवश्यक होते. पण त्यांच्याकडून आम्हांला काहीच माहिती मिळालेली नाही, असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: 'कचरा व्यवस्थापनात' डिचोलीतील सर्व पंचायती नापास! मुख्यमंत्र्यांची नाराजी; 'हरवळे'चे कौतुक

Rashi Bhavisha 06 November 2024: शेअर बाजारात गुंतवणूकीचा विचार करताय सावधान... जाणून घ्या काय सांगतयं 'या' राशीचं भविष्य

Mayem News: मयेत मोकाट गुरांची समस्या गंभीर! अपघातांना निमंत्रण; प्रत्यक्ष कारवाई कधी?

Bicholim: ..अखेर डिचोली बसस्थानक चकाचक! खड्डे बुजवून डांबरीकरण; प्रवाशांत समाधान

खरी कुजबुज: पोलिसांची ‘चिरीमिरी’ काही थांबेना!

SCROLL FOR NEXT