Goa Gomantak Digital Team
गोवा

Goa News : केरीत संरक्षक भिंत ठरतेय पांढरा हत्ती !

ढासळणाऱ्या भिंतीवर सततचा खर्च : दीड किमीसाठी 22 कोटींचा खर्च

गोमन्तक डिजिटल टीम

केरी पंचायत क्षेत्रातील आजोबा मंदिर ते केरी फेरी धक्क्यापर्यंतची संरक्षक भिंत ही सध्या पांढरा हत्ती बनत चालली आहे. सुरूच्या बनाला आणि किनाऱ्याला संरक्षण मिळावे, या स्पष्ट हेतूने सरकारने जलस्त्रोत खात्यांतर्गत केंद्र सरकारच्या निधीतून या 1.5 किलोमीटर लांबीच्या भिंतीवर आतापर्यंत 22 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

ही भिंत सातत्याने ढासळत असल्यामुळे किनारा कशा पद्धतीने नष्ट झाला, हे पर्यटक आणि स्थानिक व्यावसायिकच सांगू शकतात. पूर्वी मोठ्या प्रमाणात फेरी धक्क्याशेजारी रेती उपसा चालू होते. त्याचा परिणाम नंतर केरी झाला, जी समुद्राची वाळू मोठ्या प्रमाणात किनाऱ्यावर साचत होती. ती वाळू हळूहळू तेरेखोल नदीत येऊन केरी फेरी धक्का पर्यंत विसावली जायची. परिणामी वादळी वारे पावसामुळे हा किनाऱ्या बनासाठी आकर्षक ठरत होता.

त्या बनाला संरक्षण मिळावे, या हेतूने सरकारने दगड काँक्रीट जाळी याचा वापर करून आजोबा मंदिर ते फेरी धक्क्यापर्यंत दीड किलोमीटर लांबीची संरक्षण भिंत काँग्रेस सरकारच्या काळात सुरूवात करण्यात आली. ती आजही वीस वर्षानंतरही सुरू आहे. वादळी वारे, पावसामुळे भिंत ठिकठिकाणी खचते. परिणामी दरवर्षी या भिंतीवर करोडो रुपये दुरुस्तीसाठी खर्च केले जातात. काही ठिकाणी पदपथ उभारले, पण तेही खचत असल्याचे दिसून येते.

सरकारचे दुर्लक्ष

मांद्रे मतदारसंघातील मोरजी आश्वे, मांद्रे, हरमल , केरी हे महत्त्वाचे समुद्रकिनारे मानले जातात. या समुद्र किनाऱ्यांची दिवसेंदिवस झीज होत असल्याचे चित्र दिसून येते. शिवाय समुद्राचेही पाणी दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात त्याचा विपरित परिणाम होत आहे. याही किनाऱ्यांना संरक्षण मिळावे यासाठी आजपर्यंत सरकारने कसल्याच ठोस स्वरूपाच्या उपाययोजना केलेल्या नाहीत. मोरजी, आश्वे मांद्रे ,हरमल किनाऱ्यांचीही स्थितीत हीच आहे. किनाऱ्याची झीज थांबवणारी मारवेलही नष्ट केली जाते. शिवाय वाळूच्या टेकड्यांचे सपाटीकरण केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT